नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक तिरलोकसिंघ चौधरी यांचे आज निधन झाले आहे. त्यांची अंतिम यात्रा आज सायंकाळी 5 वाजता निघेल अशी माहिती त्यांच्या निकटवृत्तीयांनी दिली आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलात पोलीस अंमलदार या पदावरून सुरूवात करत. पोलीस उपनिरिक्षक पदापर्यंत पोहचणाऱ्या सरदार तिरलोकसिंघ निरंजनसिंघ चौधरी यांचे आज निधन झाले. त्यांचे वय 59 असे आहे. त्यांच्या अकाली निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांची अंतिमयात्रा आज सायंकाळी 5 वाजता त्यांचे निवासस्थान यात्री रोड नानकसर डेरा येथून निघणार आहे अशी माहिती त्यांच्या निकटवृत्तीयांनी दिली आहे.
सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक तिरलोकसिंघ चौधरी यांचे निधन