नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद येथे कार्यरत एका पोलीस अंमलदाराचे वडील 3 फेबु्रवारीपासून कोणालाही न सांगता निघून गेले आहेत. पोलीस अंमलदाराने जनतेला आवाहन केले आहे की, माझे वडील कोणाला दिसल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क करून माहिती द्यावी.
धर्माबाद येथे कार्यरत पोलीस अंमलदार यु.एम. मुंडे यांनी वास्तव न्युज लाईव्हला दिलेल्या माहितीनुसार आजमवाडी ता.लोहा येथे त्यांचे मुळ घर आहे. त्यांचे वडील माधवराव किशनराव मुंडे हे 3 फेबु्रवारी रोजी सकाळी 5.30 वाजता भवानीनगर कंधार ता.कंधार जि.नांदेड येथून आपल्या नातेवाईकाच्या घरातून कोणास काही न सांगता निघून गेले आहेत.
माधवराव किशनराव मुंडे यांचे वय 80 वर्ष आहे, उंची 160 सेंटी मिटर आहे. रंग सावळा आहे, त्यांनी डोक्यात लाल रंगाचा पट्का बांधलेला आहे, त्यांचे शरिर सडपातळ आहे. त्यांनी आपल्या अंगात धोतर आणि कमीज असा पोशाख परिधान केलेला आाहे. त्यांच्या नाकावर जुनी जखम आहे. त्यांना मराठी बोलता येते.
वास्तव न्युज लाईव्ह या बातमीसोबत माधवराव किशनराव मुंडे यांचे छायाचित्रपण प्रसिध्द करीत आहे. 80 वर्षाचे हे व्यक्ती कोणाला दिसल्यास त्यांनी पोलीस अंमलदार यु.एम.मुंडे यांना मोबाईल क्रमांक 9765614137 वर माहिती द्यावी.
पोलीस अंमलदाराचे 80 वर्षीय वडील हरवले आहेत