नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या कामात काही कारणाने केल्याप्रकरणी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक बरखास्त केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
दि.4 फेबु्रवारी रोजी रात्री 12 वाजेच्या अगोदर एका व्यक्तीवर जिवघेणा हल्ला झाला. तो गुन्हा 5 फेबु्रवारीच्या रात्री 1.30 वाजता दाखल झाला.या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी गेलेल्या भाग्यनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी बरखास्त केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
समतानगर येथे राहणारे देवानंद गंगाधर मोगले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशाल भंडारी, अमोल भंडारी, कृष्णा भंडारी, ओमकार भंडारी आणि इतर चार जणांनी मिळून त्यांच्यावर जिवघेणा हल्ला केला यात ते जखमी झाले. फिर्यादीने माहिती देताच भाग्यनगर येथील गुन्हे शोध पथकाचे पोलीस आरोपींना शोधण्यासाठी रवाना झाले. यात काय चुक झाली हे तर कळले नाही परंतू हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 307 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 37/2024 दि. 5 फेबु्रवारीच्या रात्री 1.30 वाजता दाखल झाला. या घटनेतील गुन्हे शोध पथकाची कुचराई लक्षात घेवून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भाग्यनगरचे गुन्हे शोध पथक बरखास्त केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. या संदर्भाने अजून माहिती घेतली असता भाग्यनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक आता वृत्तलिहिपर्यंत तेथेच कार्यरत असल्याची माहिती सुध्दा प्राप्त झाली आहे.सत्य काय हे फक्त योगश्र्वरच जाणे..