राज प्रदीप सरपे खून प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाने जामीन नाकारला

नांदेड(प्रतिनिधी)- दि.25 फेबु्रवारी 2023 रोजी राज प्रदीप सरपे याचा खून करणाऱ्या आरोपींपैकी दोघांना मकोका प्रकरणात जामीन नाकारतांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी या प्रकरणातील एका आरोपींनी पोलीसांकडे दिलेला कबुली जबाब हा मकोका कायद्याप्रमाणे शिक्षा देण्यास योग्य पुरावा आहे म्हणून दोघांना जामीन नाकारला आहे.
दि.25 फेबु्रवारी 2023 रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिडको येथे काही युवकांनी राज प्रदीप सरपे या युवकाचा खून केला. या प्रकरणी केसरबाई प्रदीप सरपे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचे गांभीर्य पाहुन या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्याकडे देण्यात आला. सुरज गुरव यांनी या प्रकरणात अटक केलेले एकूण 9 आरोपी पुढील प्रमाणे आहेत. उकाजी उर्फ बाळा उर्फ विनोद मधुकर सावळे, गोपीनाथ बालाजी मुंगल, हर्षवर्धन सुभाष लोहकरे, राजू उर्फ सिंधी महाजन धनकवाड, कुंदन संजय लांडगे, सुमित संजय गोडबोले, लहुजी उर्फ अवधुत गंगाधर दासरवाड, विकास चंद्रकांत कांबळे आणि किशन सुरेश मोरे अशी आहेत. या प्रकरणातील एक आरोपी आजही फरार आहे.
पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध प्रकारे या प्रकरणाचा तपास करून पकडलेल्या 9 जणांविरुध्द आणि फरार असलेल्या एका विरुध्द फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 299 प्रमाणे दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणाला मकोका जोडण्यात आला होता म्हणून यावर विशेष सत्र खटला क्रमांक 116/2023 असा क्रमांक मिळाला. या आरोपी पैकी गोपीनाथ बालाजी मुंगल आणि सुमित संजय गोडबोले या दोघांनी निशाणी क्रमांक 4 आणि 6 नुसार आपल्याला जामीन मिळावा अशी मागणी न्यायालयासमक्ष केली. सहाय्यक सरकारी वकील ऍड.यादव तळेगावकर यांनी केलेले सादरीकरण कोर्टाने मान्य केेले आणि मकोका कायदा कलम 18 मध्ये प्रकरणातील एखाद्या आरोपीने पोलीसांसमक्ष घटनेचा कबुली जबाब दिला असेल तर तो जबाब शिक्षा देण्यासाठी भरपूर असतो असा उल्लेख करून न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी सुमित संजय गोडबोले आणि गोपीनाथ बालाजी मुंगल या दोघांना जामीन नाकारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *