लोहा (प्रतिनिधी)- तालुक्यातील कोष्टेवाडी येथील संत बाळू मामा यांच्या पालखीनिमित्त महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाआरती झाल्यानंतर उपस्थितीत भक्तांना महाप्रसाद म्हणून भगर देण्यात आले होते. यातून कोेष्टीवाडीसह परिसरातील भक्तांना विषबाधा झाल्याची घटना रात्री उशीरा उघडकीस आली. अनेकांना उलट्या सुरू झाल्यामुळे जवळच्या लोहा ग्रामीण रुग्णालय व माळाकोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. मात्र रुग्णांची संख्या वाढत गेल्यामुळे नांदेडसह इतर ठिकाणी रुग्णांना दाखल केले. यातील मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेवून घरी पाठविण्यात आले. या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा खडबडून जागी झाली. विषबाधेची घटना झाल्याचे कळताच जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शाम वाकोडे यांच्यासह अनेकांनी रुग्णांना तात्काळ सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्यावर उपचार केले. यावेळी अनेकांनी मदतीचा हात दिला. यात लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात आंतररूग्ण विभागात 700 ऍडमिट तर विष्णूपूरी येथील जिल्हा रूग्णालयात सरासरी 1500 रूग्ण रेफर केले.यावेळी 102 च्या 8 रूग्णवाहीका तर 108 च्या 5 रूग्णवाहीका तसेच एस टी बस सह अन्य खाजगी वाहनांने काही रुग्णांना शासकीय रुग्णालय नांदेड,अहमदपूर येथे दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांना उपचार प्रकिया चालु असल्याची माहिती मिळाली.डॉ.बारी वैद्यकीय अधीक्षक, डॉ.पानसुळे, डॉ . भालके मैडम, डॉ.जाधव, डॉ.कुलदिपके, डॉ.सोनकांबळे, डॉ .लोहारे, डॉ.दिनेश राठोड, डॉ.मोटे, डॉ.देशमुख यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून रुग्णांचे प्राण वाचवले.तसेच लोहा पत्रकार संघाचे विलास सावळे, शिवराज पवार,संजय कहाळेकर, प्रविण महाबळे,विनोद महाबळे , मारोती चव्हाण यांनी पोलिस निरीक्षक अधिक्षक, तहसीलदार शंकर लाड, तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष मारोती कदम,नायब तहसीलदार,असंख्य अधिकारी व कर्मचारी यांचे ही मदत कार्य चालू आहेत. या कामी 102 चे चालक अतीश कांबळे, बालाजी घोडके, सुरेश जाधव, मेहर, सिद्धार्थ ससाणे,ज्ञानदेव आधड,भुतेवाड,स्वामी सिस्टर,आदिती गांजापूरकर सिस्टर,चाटे सिस्टर,कलमे सिस्टर, तेलंग, खिल्लारे, केंद्रे मामा आदींनी रूग्णांना उपचारासाठी भरपूर प्रमाणात मदत करत शर्थीचे प्रयत्न केले.डॉ.कानवटे,डॉ धनसडे, डॉ पवार, डॉ ब्याळे, डॉ.किलजे डॉ. राठोड आदींनी खासगी रूग्णालयात विषबाधा झालेल्या रुग्णांना उपचार सुरू केले होते. विषबाधा झाल्याची बातमी कळताच माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी भेट देऊन विचारपूस करत डॉक्टरांना रुग्णावर उपचार करण्यासाठी सुचना दिल्या.रूग्णांच्या नातेवाईकांना खिचडीचे वाटप केले.माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले,,कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार यांनी रात्री बेरात्री प्रचंड मेहनत घेतली, माजी जि प.सदस्य पुरुषोत्तम धोंडगे यांनी नारळपाणी व रूग्णांना गाड्यांची व्यवस्था केली, तसेच प्रहार संघटनेचे माऊली भाऊ गीते यांनी माळाकोळी येथील सर्व शिल्पकार यांनी खाजगी वाहन वाहनांची सोय केली, , सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रणिताताई देवरे -चिखलीकर यांनी लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.सदरील रूग्णांना विष्णूपूरी नांदेड येथील जिल्हा रुग्णालय, पालम, अहमदपूर, कंधार,लोहा शहरातील खासगी दवाखाने आदी ठिकाणी रूग्णालयातील रूग्णांवर उपचार चालू होते.तसेच डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांची टिम लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रूग्णांच्या उपचारासाठी धावून आले. लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, माळाकोळी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निरपत्रेवार यांनी ही वाहन उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली.
कोष्टवाडी येथील संत बाळुमामाच्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमात २५०० ते ३००० लोकांना विषबाधा