नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने एक विधीसंघर्षग्रस्त बालकाला पकडून त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस पकडले आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकांकडे असे हत्यार सापडने नांदेडच्या भविष्यासाठी नक्कीच धोकादायक आहे.
दि.7 फेबु्रवारी रोजी स्थानिक गुन्हाा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे हे काळेश्र्वर मंदिर परिसरात गस्त करीत असतांना त्यांना एका विधीसंघर्षग्रस्त बालकावर संशय आला. त्यांनी त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेवून त्याचे नातेवाईक व पंचासमक्ष त्याच्याकडील एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस असा 25 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोालीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांनी ही कार्यवाही करणारे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, किशन मुळे, विलास कदम, रणधिर राजबन्सी, गणेश धुमाळ, सायबरसेलचे राजू सिटीकर आणि दिपक ओढणे यांचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने अल्पवयीन बालकाकडे गावठी कट्टा पकडला