नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील बालिका मनश्री ऍड.दिपक शर्मा (बढाढरा) हिने सनदी लेखापाल(सी.ए.) यासाठी आवश्यक असलेली पहिली पायरी पुर्ण केली असून तिने फाऊंडेशन परिक्षेत 243 गुण मिळवून यश संपादन केले आहे.
नांदेड येथील सौ.राजश्री ऍड. दिपकजी शर्मा(बढाढरा) यांची कन्या कु.मनश्री यांनी आपल्या जिवनातील शिक्षणात वाणिज्य विषयात 12 पुर्ण केल्यानंतर सनदी लेखापालाच्या फाऊंडेशन परिक्षेसाठी अर्ज भरला होता. वेगवेगळ्या चार विषयांमध्ये परिक्षा देवून मनश्रीने 242 गुण संपादन करून यश मिळविले आहे. मनश्रीने मिळवलेल्या यशाचे सर्व खंडेलवाल समाजामध्ये कौतुक होत आहे. तसेच वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा मनश्री शर्माचे अभिनंदन करत जीवनाच्या पुढील परिक्षांसाठी त्यांना शुभकामना देत आहे.
मनश्री दिपक शर्मा सनदी लेखापाल परिक्षेच्या पहिल्या टप्यात उत्तीर्ण