नांदेड ग्रामीणच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षकाचे भ्रष्टाचार विरोधी पोलीस
नांदेड(प्रतिनिधी)- लाच घेण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या एका एस.टी.वाहकाला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने आज अटक केली आहे. तो एका पोलीस अंमलदाराला 3 हजार रुपये लाच देवून आपला गुन्हा दोषारोप करू नका असे सांगत होता. लाच देणाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याचा हा प्रकार बहुदा नांदेड जिल्ह्यात प्रथमच घडला आहे.
23 जुलै रोजी एका पोलीस अंमलदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली की, त्याच्याकडे गुन्हा क्रमांक 513/2021 कलम 294, 506 नुसार दाखल झालेला तपासासाठी आहे. त्या गुन्ह्यातील आरोपी आनंद सखाराम तिगोटे (33) एस.टी.महामंडळात वाहक बकल क्रमांक 16532 रा.संभाजी चौक सिडको हा आहे. एस.टी.वाहकाविरुध्द दाखल झालेल्या या गुन्ह्यात त्याच्याविरुध्द दोषारोप न पाठवता अंतिम अहलवाल पाठवावा अशी वाहक आनंद तिगोटेची मागणी होती. त्यासाठी तो 3 हजार लाच देण्यास तयार होता.
नांदेड ग्रामीणच्या अत्यंत कर्तव्यदक्ष, भ्रष्टाचारापासून दुर राहण्यासाठी आपल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना नेहमीच मार्गदर्शन करणाऱ्या पोलीस निरिक्षकांच्या मातहत असलेल्या या पोलीस अंमलदाराने लाच घेण्याबाबतची तक्रार केली. आज 24 जुलै रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या इमारतीत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि वाहक आनंद तिगोटेने अयोग्य काम करण्यासाठी पोलीस अंमलदाराला 3 हजार रुपये लाच दिली आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास गजाआड केले. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक राहुल पखाले, बालाजी तेलंगे, गणेश तालकोकुलवार, सचिन गायकवाड, मारोती सोनटक्के यांनी पार पाडली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक राजेश पुरी, पोलीस अंमलदार संतोष शेट्टे, एकनाथ गंगातिर, दर्शन यादव, शेख मजीब यांनी ही सापळा कार्यवाही पार पाडली. लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याध्यापकाची माहिती देतांना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल,ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512 आणि पोलीस उपअधिक्षक विजयडोंगरे यांचा मोबाईल क्रमांक 8975769918 यावर सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.