नांदेड(प्रतिनिधी)-मी कॉंगे्रस विधी मंडळ पक्षाचा राजीनामा दिला. परंतू भारतीय जनता पार्टीची कार्यपध्दती मला अजून माहित नाही असे म्हणत असतांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा विचार केला नाही की, ज्या जनतेनी हे शब्द ऐकले आहेत. ते काही एवढे येडे आहे काय? सर्व काही त्यांनाही समजले आहे, आपण दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. पण आपण कोणती राजकीय भुमिका जाहीर करणार आहात याची कल्पना जनतेला पण आहे साहेब.
आज 12 फेबु्रवारी रोजी नांदेडचे भुमिपूत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक शंकरराव चव्हाण यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंगे्रस पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा महाराष्ट्राचे कॉंगे्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिलेले पत्र व्हाटसऍपवर व्हायरल झाले. अनेक वृत्तवाहिन्यांनी कॉंगे्रस पक्षाला खिंडार अशा स्वरुपाच्या बातम्या प्रसिध्द केल्या. माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांनी सुध्दा मसका हा राजकीय पक्ष स्थापन केला होता. पण काही दिवसांनी मसकाचा विलय कॉंगे्रस पक्षात झाला असो.
1984 मध्ये नांदेडचे खासदार या पदावरून अशोक चव्हाण यांनी आपले वडील शंकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात राजकीय जीवनाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी विधानसभेत प्रवेश केला आणि आपल्या कार्याने एक-एक पद गाठत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद गाठले. दुर्देवाने एका सदनिका प्रकरणात त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर ते आमदार झाले, वेगवेगळे मंत्री पद त्यांनी भुषवले. मागील काही दिवसांपासून राज्यात कॉंगे्रसला सोडून भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी कॉंगे्रस आणि शिवसेना शिंदे गट यांनी मिळून सरकार स्थापन केले. त्यानंतर खुप वेगवेगळ्या चर्चा समोर आल्या. अनेक वेळेस आम्ही सुध्दा आपण भारतीय जनता पार्टीत जाणार आहात काय? असे प्रश्न अनेकदा विचारले असता मी कदापी कॉंंग्रेस सोडणार नाही असे अशोक चव्हाण म्हणाले होते. परंतू आज त्यांनी कॉंगे्रस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा तर दिला. परंतू अद्याप माझी राजकीय भुमिका मी ठरवली नाही त्यासाठी मला काही वेळ हवा आहे. दोन दिवसात मी माझी राजकीय भुमिका जाहीर करणार आहे असे सांगितले.
प्राचिन ग्रीक शब्द पॉलिटीका या शब्दापासून पॉलिटीक्स या शब्दाची उत्पत्ती झाली. पॉलिटीक्स या शब्दाचा विकीपिडीया भरपूर काही सांगतो असेही सांगितले जाते की, पॉली नावाचा एक किडा आहे आणि तो रक्तपितो म्हणून पॉलिटीक्स हा शब्द तयार झाला. या उल्लेखाचा कुठे पुरावा मिळत नाही. परंतू अनेक वर्षापासून आम्ही हे ऐकत आलो आहोत. काय असते पॉलिटीक्स अर्थात राजकारण? याचा उल्लेख विषद केला तर आमच्यावर बरेच लोक नाराज होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही ते विश्लेषण टाळतो आहोत.
आता भारतात लोकशाही शिल्लक राहिली की, नाही याची भिती नक्की वाटायला लागली आहे. मोदी सरकारने कोण-कोणत्या भिती दाखवून कोणा-कोणाला भारतीय जनता पक्षात आणले याची यादी तयार केली तर ती ऐवढी मोठी होईल की, त्यासाठी आमचे शब्द कमी पडतील. असे म्हणतात युध्द आणि प्रेमात सर्व काही चालते ते चुकीचे केले असेल तरी त्याला महत्व आहे. पण ज्या प्रगल्भ लोकशाहीची जगभरात चर्चा होते ती भारताची प्रगल्भ लोकशाही आता हळूहळू खाईमध्ये लोटली जात आहे असे म्हटले तर चुक ठरणार नाही. कोणताच विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही तर लोकशाही जिवंत कशी राहिल. या प्रश्नाचे उत्तर आम्हालाही सांगता येणार नाही.
नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाणांच्या पाठीमागे खंबीर उभे राहणारे अनेक कार्यकर्ते आजच्या घडीला साहेबांचे चुकले असेच म्हणत आहेत. दोन पिड्यांपासून ज्यांनी कॉंगे्रस पक्षाच्या छत्राखाली आपले राजकारण उभारले आता त्यांना काही दिवसात जय श्रीराम म्हणावेच लागणार आहे. श्री राम हे अशोक चव्हाणांचे नाहीत असे आमचे म्हणणे नाही. पण राजकीय विरोधक म्हणून श्री राम कधीच अशोक चव्हाणांचे नव्हते पण आता त्यांना श्री राम आपलेसे करावे लागतील. त्या जनतेचे काय? ज्यांनी आपल्याला कॉंगे्रस पक्षाच्या नावावर मतदान दिले. म्हणजे आपण जिकडे जाताल तिकडेच जनता येईल हा विचार न पटणारा आहे आणि जनतेने का यावे. त्यांनी आपल्याला रेकॉर्डब्रेक मतदान देवून आमदार बनवले. त्यासाठी तुमच्याकडे कॉंग्रेस पक्षाचेच छत्र होते. पण आता उद्या दुसरे छत्र घेवून तुम्ही जनतेकडे येणार असाल तर जनता सुध्दा याचा विचार नक्कीच करेल.
मी नाही त्यातली म्हणत अशोक चव्हाण भाजपाच्या वाटेवर?