नांदेड ( जिमाका ):- नांदेडच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा सोमवारी प्रवीण टाके यांनी पदभार स्वीकारला. प्रवीण टाके हे नागपूर येथून नांदेड येथे या पदावर रुजू झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने काढलेल्या बदली आदेशानंतर यापूर्वीचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार हे नागपूर येथे रुजू झाले आहेत. त्यांच्या जागेवर प्रवीण टाके यांनी आज पदभार सांभाळला. प्रवीण टाके यांनी यापूर्वी नवी दिल्ली, मुंबई, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी व समकक्ष पदावर काम केले आहे. यापूर्वी लोकमत, सामना तरुण भारत, नागपूर पत्रिका आदि वृत्तपत्रांमध्ये पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले प्रवीण टाके एक प्रतिभावान कवी,लेखक असून त्यांची फकीर ही कादंबरी प्रकाशित आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर त्यांनी स्तंभलेखन केले आहे.
Related Posts
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गत 24 तासात 100 रुग्ण बरे होऊन परतले घरी
▪️48 रुग्णांवर शस्त्रक्रिया ▪️1 हजार 165 रुग्णांवर उपचार ▪️रुग्णालयामध्ये भरती रुग्ण 726 नांदेड, (जिमाका) :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय…
राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महिला हेल्मेट रॅली संपन्न
नांदेड (प्रतिनिधी ) – राज्य रस्ता सुरक्षा अभियान-2023 हे दिनांक 11 ते 17 जानेवारी 2023 दरम्यान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत…
जन्मदिनी रक्तदान शिबिर आयोजित करून बाली कांबळेने सामाजिक कार्याची जाण ठेवली-आ.मोहन हंबर्डे
नांदेड(प्रतिनिधी)-रक्तदान शिबिर आयोजित करून बाली कांबळे यांनी आपला जन्मदिवस साजरा करतांना रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक कार्याला हातभार लावला असे…