मुंबई- येथील एक सहाय्यक पोलीस निरिक्षक आपल्या शासकीय कामासाठी मुंबई ते पुणे प्रवास करत असतांना त्यांच्या चाणक्ष नजरेने हेरलेला एक गुन्हा अत्यंत उत्कृष्टपणे त्यांनी निकाली काढला. त्यांच्याच शब्दात त्यांची कामगिरी नमुद केली आहे जगदीश काशिकर यांनी.
दिनांक 08 फेबु्रवारी 2024 रोजी मी मा. पोलीस उप आयुक्त साहेब यांचे परवानगीने कोर्ट साक्ष कामी जिल्हा सत्र न्यायालय शिवाजीनगर कोर्ट, पुणे येथे सिंहगड एक्सप्रेस ने जात असताना ट्रेन मध्ये एक 30 वर्षीय व्यक्ती एका 8 वर्षाच्या मुलीला घेऊन प्रवास करीत होता. प्रवासा दरम्यान ते एकत्रित डब्ब्यात होते सदर व्यक्ती त्या मुलीला तिने न मागताही नि खाऊ घेऊन देत होता. त्यामुळे मुलगीही त्याच्या सोबत खुशीने प्रवास करीत असल्याचे दिसत होते. परंतु मुलगी मराठी बोलत होती आणि सदर व्यक्ती हिंदीतून बोलत होती. माझ्या जवळच उभी असल्याने मी तिला बसायला माझ्या शेजारी जागा देऊन मुलीला आईविषयी विचारणार केली असता आई घरी असल्याचे सांगितले. मी सदर व्यक्ती तिचा बाप असावा असे समजून तिला बोलत होतो. पण व्यक्ती हिंदी भाषिक असल्याने मी सदर व्यक्तीला मुलगी तुमची कोण आहे अशी विचारणा केली असता त्याने माझीच मुलगी असल्याचे सांगितले परंतु त्याच वेळी मुलीचा चेहरा सदर व्यक्ती तिचा बाप नसल्याचे सांगत होता. मी मुलीकडे गप्पा मारत असताना सदर व्यक्ती मुलीला डोळे वाटरून माहिती देण्यापासून रोखत असल्याचे माझ्या लक्षात आल्याने मी मुलीला तिच्या आई चा मोबाईल क्रमांक मागितला. त्यावेळी सदर व्यक्ती पुन्हा तिला खुणावत असल्याचे दिसले. विनाकारण आपण चौकशी करत असल्याने बापाला आवडत नसावे म्हणून मी पुन्हा माझ्या मोबाईल मध्ये बघत बसलो त्यावेळी माझ्या मोबाईल मध्ये माझा युनिफॉर्म वरचा फोटो पाहून मुलीने आश्चर्याने मला विचारले की तुम्ही पोलीस आहात त्यावेळी मी हो म्ह्णून मान हलवली. मुलीच्या आई ला मुली सोबत बोलणं करून द्यावं आणि नवरा बायकोच जमत नसावे आणि बाप मुलीला घेऊन जात आहे याचं कारण शोधण्यासाठी मी तिला तिच्या आईचा मोबाईल क्रमांक मागितला असता तिने मामाचा मोबाईल क्रमांक संगीतला. त्यावेळी ती व्यक्ती मुलीला घेऊन जाण्यास निघाली तेंव्हा मी त्यास पुन्हा नाते विचारले असता त्याने माझी बहीण असल्याचे सांगितले. मग लागलीच त्याला पकडून खाली बसवले व मुलीच्या मामाला कॉल करून विचारपूस केली असता काही वेळातच मुलीच्या आई वडिलांचा कॉल आला आणि मुलगी घरातून शाळेला गेलेली परत आली नसल्याचे समजले त्यावेळी त्यांना माझी ओळख करून देऊन मुलगी सुखरूप असून मुलगी सुरक्षित पुणे लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द करू असे सांगून मुलीचे आई वडिलांना वालीव पोलीस ठाणे, मीरा – भाईंदर, वसई – विरार येथे गुन्हा दाखल करण्यास सांगितले. लोहमार्ग पोलीस ठाणे येथे ट्रेन मधील नागरिकांच्या मदतीने (लोणावळा पासून लोहमार्ग चा एक अंमलदार मदतीला लोहामार्ग नियंत्रण कक्षाकडून मिळाला ) मुलगी व आरोपीला पुणे स्टेशन येथे लोहमार्ग पोलिसांचे ताब्यात सुखरूप दिले आहे. मुलीचा मामा सचिन शेलार यास पुणे स्टेशन येथे आम्ही स्वतः बोलावून घेतले होते.वालीव पोलीस ठाणे गु र नं 79/2024, कलम 363 भा द वि नुसार दाखल करण्यात आला आहे.आरोपीचे नाव :- दयानंदकुमार शर्मा, वय अंदाजे 30 वर्षे, रा – मूळ बिहार.
प्रवासादरम्यान सहाय्यक पोलीस निरिक्षकाने केलेली दमदार कामगिरी