नांदेड (प्रतिनिधि)-13 फेब्रुवारी रोजी श्रीl यादव अहिर गवळी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा द्वारिकाधाम, नरहर कुरुंदकर हायस्कुल मैदान, कौठा, नांदेड़ येथे संपन्न झाला.
आंध्रप्रदेश,तेलंगणा,मध्यप्रदेश आणि संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 38 जोडपी या आदर्श अंतरराज्यीय विवाह सोहोळ्यात विवाहबद्ध झाली.
नांदेड़ येथील गवळी समाज मागील 25 वर्षापासुन असे सामूहिक विवाह समारोह आयोजित करतो ज्यात आतापर्यंत 831 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत यावेळी जवळपास 20 हजार समाज बांधव नवदंपतिला शुभाशीर्वाद देण्याकरिता येथे जमले होतो
संपूर्ण विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी गुरुद्वारा बाबा दीपसिंघजी बोर्ड,श्री कृष्ण कोकाटे नांदेड़ पोलीस अधीक्षक,नरहर कुरुंदकर शाळेचे संचालक मंडळ,उपायुक्त अजितपाल संधू, महानगरपालिका नांदेड़, वाहतुक शाखा 02 चे इतवारा येथील पोलीस निरीक्षक रावसाहेब गुट्टे, राजू भैया गोरे, तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पूर्ण यंत्रणेने मोलाची भूमिका बजावली आहे
या महाकुंभात स्वच्छता, सुरक्षितता,अबाधित ठेवण्यासाठी संपूर्ण यादव अहीर गवळी समाज उपरोक्त मान्यवरांचा आभारी आहे असे अध्यक्ष दुर्गाप्रसाद बटाउवाले यांनी सांगितले दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात अनेक समिति स्थापन करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सदर सोहळा संपन्न करण्यात आला ज्यात भोजन समिति,वैवाहिक कार्यक्रम समिति, बिछायत,कन्यादान,रूम व्ययस्थान,वाहतुक, खरेदी,मंच संचालन आदींचा समावेश होता
वैवाहिक कार्यक्रम अत्यंत दिमाखदार पद्धतीने सर्व समाज वैवाहिक विधि पूर्ण करत 38 ब्राह्मणाच्या उपस्थितीत मंत्रोच्चारण करून अत्यल्प खर्चात झालेत ज्यामुळे समाज बांधवांचे करोड़ों रुपए वाचले आहेत.
आजकाल पैशाची उधळपट्टी करून होणाऱ्या विवाह करणाऱ्यासमोर यादव समाजाने एक आदर्श ठेवला आहे अशी भावना उपायुक्त संधू यांनी व्यक्त केली तर यादव समाज हा अत्यंत गतिमान पद्धतीने आपली सर्वांगीण प्रगती साधेल असे मत रावसाहेब गुट्टे यांनी व्यक्त केले.
हा दोन दिवसाचा सोहळा यशस्वी करण्यासाठी मागील अनेक महिन्यापासून संपूर्ण गवळी समाजातील महिला, आबालवृद्ध एकंदरीत संपूर्ण समाजाने खूप मेहनत घेतली आहे