नांदेड(प्रतिनिधी)-प्रतिबंधीत असलेला अंमली पदार्थ गांजा ऍटोत बसून विक्री करणाऱ्या दोघांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखने पकडून त्यांच्याविरुध्द भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वैजनाथराव वाहुळे यांना तरोडा (बु) येथे पाठविले. त्या ठिकाणी दिलराजनगरच्या पाटीजवळ एक ऍटो क्रमांक एम.एच.26 बी.डी.1329 थांबलेला होता. त्यामध्ये सिध्दार्थ साहेबराव पाईकराव (28) आणि शंकर नरसिमलू पोमार (54) हे बसलेले होते. त्यांच्याकडे 1 किलो 250 ग्रॅम गांजा सापडला. सोबतच ऍटो असा एकूण 1 लाख 80 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा प्रकार 13 फेबु्रवारीच्या दुपारी 3 वाजता घडला.
रवि वैजनाथराव वाहुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सिध्दार्थ पाईकराव आणि शंकर पोमार यांच्याविरुध्द एनडीपीएस कायदा कलम 20 (ब), 22(ब) नुसार गुन्हा क्रमांक 45/2024 भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नागरगोजे हे करणार आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेने दीड किलो गांजा पकडला