उमरी (प्रतिनिधि)- श्री यशवंतराव ग्राम विकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा ता उमरी व नवरत्न सेवाभावी संस्था बिलोली च्या संयुक्त विद्यमाने 19 व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक व कादंबरीकार प्रा. मनोज बोरगांवकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
एकदिवसीय साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी व शोभा याञा,उद्घाटन सोहळा,पुरस्कार वितरण,ग्रंथ प्रदर्शन ,भोजन अवकाश,कथाकथन व कविसंमेलन असे स्वरूप राहणार असल्याची माहिती एका प्रसिद्धी पञिकाद्वारे संयोजक श्री दिगंबर कदम व माधवराव फुलारी यांनी दिली आहे.
जेष्ठ साहित्यिक श्री देवीदास फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली संवेदना निवासस्थानी सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली.
बैठकीस अॅड. एल.जी.पुयड,प्रा.नारायण शिंदे,महेश मोरे,व्यंकटेश चौधरी,निर्मलकुमार सूर्यवंशी,सोपानराव लामकाणीकर,नागोराव डोंगरे,भगवानराव कदम,राजू श्रीरामवार, राम तरटे ,इंजिनियर मिलींद गायकवाड आदि सल्लागार उपस्थित होते.
19 व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.मनोज बोरगांवकर यांची निवड