नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडच्या एका व्यापाऱ्याला ब्लॅकबेरी, मुफ्ती, बिंगयुमन, कलर प्लस, पार्क ऍव्हेनिव्ह याा नामांकित कंपन्यांची फ्रॅन्चायसी देतो म्हणून भिलवडा राजस्थान येथील पती-पत्नीने नांदेडच्या व्यापाऱ्याची 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
दिपक मनिष भाग्यवानी यांचे नांदेड शहरात आयएएस सलेक्शन नावाची कपडे, बुट, बॅट, चपल आदी सामान विकण्याची दुकान आहे. शास्त्रीनगर भिलवाडा राजस्थान येथील दिलीपकुमार संपतजी बोरा आणि त्याची पत्नी प्राची या दोघांची मे.आय हेल्प यु या नावाची कंपनी आहे. त्या दोघांनी नांदेडच्या दिपक भाग्यवानीला विविध नामांकित कंपन्यांची फ्रॅन्चायसी देतो म्हणून त्यांच्याकडून 10 जानेवारी 2019 ते 17 नोव्हेंबर 2023 दरम्यान एकूण 26 लाख रुपये दिले. या दरम्यान नामांकित कंपन्या वगळता अत्यंत खराब गुणवतेचे साहित्य पुरवले. या बद्दल माझे पैसे परत करा असे दिपक भाग्यवानीने सांगितले असता तुच माझा माल परत कर नाही तर तुझ्या विरुध्द खटला दाखल करील असे दिपकुमार आणि प्राचीने सांगितले.
वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्याा कलम 420, 406, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 67/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्या मार्गदर्शनात तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राजू वटाणे यांच्यााकडे देण्यात आला आहे.
नामांकित कंपन्यांची फ्रॅन्चायसी देतो म्हणून 26 लाखांची फसवणूक; पती-पत्नी आरोपी