नांदेड(प्रतिनिधी)-भुमिअभिलेख कार्यालयात जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड.आशिष गोदमगावकर यांनी एका अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला शिवीगाळ केल्याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द ऍट्रॉसिटी कायदा आणि भारतीय दंड संहितेची कलमे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. प्राप्त माहितीनुसार शेषराव दत्तात्रय जेठेवाड (70) रा.विद्युतनगर नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या वारसा नोंदणी कार्यवाही संबंधाने जिल्हा भुमि अभिलेख कार्यालय नांदेड येथे 30 जानेवारी 2024 रोजी सुनावणी होती. त्यावेळी न्यायाधीशांसमोर ऍड.आशिष गोदमगावकर हे अडथळा निर्माण करत होते. त्यावेळी फिर्यादी शेषराव जेठेवाड यांनी मला अडथळा आणू नका अशी विनंती ऍड.आशिष गोदमगावकर यांना केली असतांना आशिष गोदमगावकर यांनी अर्वाच्च शिवीगाळ करत डुकरा, कुत्र्या, तुला आफीसच्या बाहेरच कुत्र्यासारखे बुटाने मारतो असे म्हणाले. त्यानंतर फिर्यादी न्यायालयाबाहेर आल्यानंतर नरसींग जेठेवाड यांनी फिर्यादीच्या अंगावर मारण्यासाठी धावून आला. त्यावेळी बहिण मध्यस्थी करत असतांना बहिणीस सुध्दा मारहाण केली. दोन्ही आरोपींनी मिळून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यानुसार वजिराबाद पोलीसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 3(1) (आर)3(2) (व्ही.ए.) तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 68/2024 दाखल केला आहे. हा गुन्हा सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे यांनी दाखल केला आहे आणि अनुसूचित जाती जमातीचा कायदा असल्यामुळे तपासासाठी पोलीस उपअधिक्षक शहर यांच्याकडे वर्ग केला आहे.
Related Posts
आकस्मात मृत्यूचे प्रकरण आता खूनात बदलले
नांदेड(प्रतिनिधी)-विहिरीत पडून मरण पावलेल्या एका 48 वर्षीय व्यक्तीबाबत दाखल झालेला आकस्मात मृत्यू आता त्यांच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार खूनाच्या स्वरुपात बदलला…
एकंबा ता.हिमायतनगर येथे 1 लाख 22 हजारांची चोरी; जिल्हा परिषद शाळा फोडून चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-एकंबा ता.हिमायतनगर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. धर्मानगर तांडा ता.मुखेड येथील शाळेतून विद्यार्थ्यांचे…
नांदेड ग्रामीण पोलीसांना मटका जुगार बंद करायचाच नाही ?
अनेक पोलीस अधिकारी ज्या व्हॉटसऍप गु्रपचे सदस्य आहेत त्यावर फोटो वायरल झाल्यावर सुध्दा कारवाई केल्याचा खुलासा केला नाही नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण…