नांदेड(प्रतिनिधी)- उमरी शहरातील बस स्थानकाशेजारी अक्षय अग्रवाल यांच्या घराच्या शेजारी जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली असता त्यांनी दि.15 फेबु्रवारी रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास धाड टाकून यात 5 जणांकडून 14 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली.
उमरी शहरातील बसस्थानक परिसरात अक्षय अग्रवाल यांच्या घराशेजारी काही जण तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती नांदेड स्थानिक गुन्हा शाखेला प्राप्त झाली. या माहितीआधारे दि.15 रोज गुरूवारी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने धाड टाकून यामध्ये बालाजी गंगासागरे(26) रा.उमरी, मारोती सोनकांबळे (58) रा.चिंचाळा, अक्षय अग्रवाल(29) रा.उमरी, साईनाथ डुबूकवाड (32) रा.उमरी आणि बालाजी सुर्यवंशी (40) रा.उमरी हे तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले यांची झाडाझडती घेतली असता 14 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल अढळून आला. याबाबत पाोलीस उपनिरिक्षक आनंद बिच्चेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मटकाबुक्कीवर धाड तिघे ताब्यात
शहरातील मच्छी मार्केट येथे काही जण टाईम बाजार व कल्याण नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हा शाखेने छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. यांच्याकडून नगदी 9 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात जुगार खेळणारे शोखत अली अब्दुल खादर (54) बालाजी रुद्रावार(52) आणि मुजीब चांद पाशा शेख (37) हे तिघे रा. उमरी येथील असून त्यांच्याविरुध्द पोलीस अंमलदार गंगाधर कदम यांच्या तक्रारीवरुन उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उमरी येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून 14 हजारांचा मुद्देमाल जप्त