नांदेड(प्रतिनिधी)-तुझा मुलगा माझ्या ताब्यात आहे असे फोन क्रमांकावर सांगुन 15 लाख रुपये दे अशी मागणी करणाऱ्या फोन मालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सिटी मॅक्स स्टुडिओचे मालक दिलीप हरीभाऊ माहोरे यांना 15 फेबु्रवारी रोजी सकाळी 11 वाजेच्यासुमारास फोन कॉल आला. हा फोन क्रमांक 12 आकड्यात लिहिला आहे 892021384404 असा आहे. या फोनवरून फोन करणाऱ्याने दिलीप माहोरेला सांगितले की, तुझा मुलगा वेदांत माझ्या ताब्यात आहे. त्याला सोडवायचे असेल तर 15 लाख रुपये दे नाही तर तुझ्या मुलाला खतम करतो अशी धमकी देवून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. शिवाजीनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 385 आणि 387 नुसार गुन्हा क्रमांक 66/2024 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक जालिंधर तांदळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गिते यांच्याकडे हा तपास देण्यात आला आहे.
तुझा मुलगा माझ्या ताब्यात आहे त्याच्यासाठी 15 लाखांच्या खंडणीची मागणी