नांदेड(प्रतिनिधी)-विविध कृषी योजनांची माहिती देवून आणि त्यातून मिळणाऱ्या लाभाचे आमिष दाखवून तिन जणांनी उमरी येथील सेवा कृषी केंद्र मोंढाचे मालक किशन गंगाराम जाधव यांची आणि तानाजी देशमुख यांची 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
किशन गंगाराम जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 फेबु्रवारी 2023 ते 26 जून 2023 दरम्यान त्यांच्यासह इतर तिन जणांना शासनाच्या योजनेतील शेडनेटचे काम करून देतो असे सांगून त्यांच्याकडून अगोदर प्रोसेस फिस 80 हजार, प्रोजेक्ट रिपोर्टसाठी 50 हजार तसेच शेड नेटच्या कामाचे कागदपत्र आणण्यासाठी ऍडव्हान्स 2 लाख, व्याज दरामध्ये 50 टक्के व्याज कमी करण्यासाठी कर्जाच्या 10 टक्के मागणी केली. कर्जाच्या प्रोसेसिंगसाठी फिर्यादी किशन जाधव आणि इतर तिघांकडून कोरे मुद्रांक बॅंक ऍग्रीमेंट करून घेतले. त्यांच्याकडून प्रत्येकी 1 लाख रुपयांचा धनादेश अनामत किंमत म्हणून घेतला. नेट शेडचे काम करण्यासाठी प्रत्येकी 5 लाख रुपये असे एकूण 26 लाखांची फसवणूक झाली आहे. या तक्रारीमध्ये बालाजी मोतीराम पवार रा.शेख राजूर ता.पालम जि.परभणी, आनंदराव माने आणि सचिन साबळे दोघे रा.सातारा जनता अर्बन नेथीली किरवाडी ता.करवीर जि.कोल्हापूर यांची नावे आरोपी या सदरात आहेत. उमरी पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 468, 470, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 73/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक एम.एन.चेवले यांच्याकडे देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची 26 लाखांची फसवणूक