नांदेड(प्रतिनिधी)-श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सल्युट प्रदान करून अभिवादन केले.
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी छत्रपतींना पुष्पहार अर्पण करून त्यांना सल्युट अर्पण करून त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागांचे अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी सुध्दा छत्रपतींना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार संजय सांगवीकर, मारोती कांबळे आणि विनोद भंडारे यांनी केले होते.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीकृष्ण कोकाटे यांचा सल्युट