नांदेड(प्रतिनिधी)-काही विचारवंत सांगतात माझ्या जीवनात माझा बाप हा सर्वात श्रीमंत आहे. पण एका अल्पवयीन बालिकेने आपल्या वडीलांच्या गरीबीला झटका देत आपली जीवन यात्रा गळफास घेवून संपवली. गरीबीचा यापेक्षा घाणेरडा उल्लेख काय करता येईल. हे लिहितांना सुध्दा दु:ख वाटत आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आणि हमाली करणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलीने जिचे वय फक्त 17 वर्ष 3 महिने आहे. दि.18 फेबु्रवारी रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास आपल्या घरातील छताच्या कडीला गळफास घेवून आत्महत्या केली. मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या खबरीमध्ये वडीलांच्या गरीबीला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे असे लिहिले आहे. या संदर्भाने आकस्मात मृत्यू क्रमांक 25/2024 दाखल करण्यात आला आहे. पुढे याचा तपास सुध्दा होईल हा भाग वेगळा आहे.
आज महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आम्ही गरीबांसाठी काम करत आहोत, तेच आमचे खरे केंद्र आहे. असे दाखवत असले तरी एका अल्पवयीन बालिकेने आपल्या वडीलांच्या गरीबीला कंटाळून आत्महत्या केल्याची ही घटना नक्कीच त्रासदायक आहे. काही विचारवंत व्यासपीठावर उभे राहुन सांगतात माझ्या वडीलांच्या खिशात दहा रुपये नसतांना सुध्दा त्यांनी मला कधीच 100 रुपयंाची वस्तु आणून देण्यासाठी नकार दिलेला नाही. त्यांच्यातील हे दु:ख मला मी मोठा झाल्यावर कळाले म्हणून मी माझ्या वडीलांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती समजतो. व्यासपीठावरील बोलणे आणि प्रत्यक्षातील जगणे हे दोन वेगळे विषय आहेत. एक हमाली करणारा व्यक्ती आणि त्याच्या 17 वर्षीय मुलीने आत्महत्या करून गरीबीवर थट्टेचा शिंतोडा उडवत आपले जीवन मात्र संपवले आहे.
अल्पवयीन बालिकेने आत्महत्या करून गरीबीची उडवली थट्टा