खंजीरचा धाक दाखवून गुगल पे वर पैसे ट्रान्सफर करून दरोड्याचा नवीन प्रकार

नांदेड(प्रतिनिधी)-नागार्जुना हॉटेलसमोर दोन युवकांनी मिळून एका युवकाने जबरदस्तीने तिसऱ्याचा मोबाईल घेवून जिवे मारण्याचा धाक दाखवून त्याच्या फोन पे वरुन 1100 रुपये काढून घेतल्याचा नवीन जबरी चोरीचा गुन्हा घडला आहे.
स्वप्नील वसंत मगरे रा.डॉ.आंबेडकरनगर नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 फेबु्रवारी रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारा ते नागार्जुना हॉटेलच्या बाजूला अंधार असलेल्या ठिकाणी थांबले असतांना नंदीग्राम सोसायटीमधील जसपाल व करण नावाचे दोन युवक तेथे आले आणि त्यांनी बळजबरीने खंजीरचा धाक दाखवून स्वप्नील मगरेचा मोबाईल काढून घेतला. नंतर त्या दोघांनी त्याला आपल्या घरी नेले तेथे मारहाण करून त्याचा मित्र अमिशेख याच्या मोबाईलचा पासवर्ड बळजबरीने घेतला आणि गुगलपेवरुन 1100 रुपये त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले.
शिवाजीनगर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 365, 394, 342, 34 सह भारतीय हत्यार कायदा 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 67/2024 दाखल केला आहे. शिवाजीनगर पोलीस निरिक्षक जालींदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक माने यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *