पिरबुऱ्हाणनगर येथे दोन गटात राडा

नांदेड(प्रतिनिधी)- शहरातील पिरबुऱ्हाणनगर परिसरात सकाळी 11 वाजेच्यासुमारास काही मोटारसायकल स्वार सायलंन्सरचा मोठा आवाज करत फिरत असतांना या परिसरातील नागरीकांनी त्यांना आवाज करू नका असा आव्हाण करत असतांनाा या दोघांमध्ये बाचा-बाची होवून हे प्रकरण दगडफेकी पर्यंत गेले. वेळीच पोलीसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आज शिवजन्मोत्सवामुळे अनेक तरुण आपल्या मोटारसायकलच्या सायलन्सरचा आवाज मोठ्या आवाजत करून शहरातील अनेक रस्त्यावर फिरत होते. यातच अशोकनगर येथून पिरबुऱ्हाणकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही मोटारसायकल स्वार तरुणांनी आपल्या गाडीचा आवाज मोठ-मोठ्याने करून फिरत होते. त्यावेळी या परिसरातील नागरीकांनी आवाज कमी करा असे सांगितले असता त्यांनी या नागरीकांसोबत हुज्जत घातली. यातच काही तरुणांनी लागलीच दगडफेक केली. यात स्कुल बस आणि एक बुलट या दोन वाहनांची मोठ्या प्रमाणात नासधुस केली. या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना मिळताच ते तात्काळ  अपर पोलीस अधीक्षक अभिनाशकुमार यांच्यासह पोलिस फौजफाटा घेवून घटना स्थळी दाखल झाले व हा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता. वेळीच पोलीसांनी हस्तक्षेप केल्यामुळे सध्या परिसरात तणावपुर्व शांतता असल्याचे पोालीसांनी सांगितले.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा पाच लोकांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आली आहे, त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार स्वतः रात्री 11.30 वाजेपर्यंत भाग्यनगर पोलीस ठाण्यात हजर असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *