नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने म्हाळजा येथील ज्ञानमाता विद्याविहार या शाळेचा मालमत्ता कर भरला नाही म्हणून प्राचार्याचे कक्ष सील केले आहे. त्यांच्याकडे 18 लाख 53 हजार 931 रुपये मालमत्ता कर थकबाकी आहे.
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरातील म्हाळजा भागात असलेल्या ज्ञानमाता विद्याविहार यांच्याकडे असलेल्या मालमत्तेतील दोन मालमत्तांवर 18 लाख 53 हजार 931 रुपये रक्कम थकबाकी झाली आहे. आज त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, मुल्य निधारण व संकलन अधिकारी अजितपालसिंघ संधू यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक आयुक्त संजय जाधव, वसुली पर्यवेक्षक संतोष जिंतूरकर, साहेबराव ढगे, वसुली लिपिक सचिन गजभारे, कृष्णा पाथरकर, उपस्थित होते. मालमत्ता धारकांनी आपला मालमत्ता कर वेळेत भरून घ्यावा नाही तर नळ बंद करणे, ट्रेनेज बंद करणे आणि मालमत्ता सिल करणे अशी कार्यवाही मालमत्ता धारकांवर होणार आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांनी आपला थकबाकी कर भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
ग्यानमाता विद्या विहारकडे 18 लाखापेक्षा जास्त मालमत्ता कर थकबाकी असल्याने शाळेचे कार्यालय सील