प्रहार जण शक्ती पक्षाचा कार्यक्रम
नांदेड,(प्रतिनिधी)- प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आज दि.२८ जुलै रोजी असंख्य महिलांनी शहरातील महामानवांच्या पुतळ्याजवळ जाऊन तुम्हीच परत या अशी विनंती त्यांना केली. अशाप्रकारचे अजब आंदोलन आज घडले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे विठ्ठल दत्तराव कल्याणकर,विठ्ठलराव मंगनाळे,प्रितपालसिंघ शाहू,रुखमाजी जोगदंड,शिवचरण ठाकूर,विजयाताई सुधाकर काचावर,लता प्रेमदास हरकरे,अश्विनी बालाजी बळेगावे यांच्यासह असंख्य निराधार महिलांनी एक अजब मोर्चा काढला. या मोर्चाची सुरवात महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यापासून सुरवात झाली. पुढे हा मोर्चा लोकशाहीर आणाभाऊ साठे,महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,छत्रपती राजश्री शाहू महाराज,छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हा मोर्चा पोहोचला. मोर्चेकऱ्यांनी त्यांना मिळणारे संजय गांधी निराधार योजनेतील मानधन गेली ६ महिन्यांपासून थकीत आहे. नवीन लाभार्थ्यांच्या संचिका मंजूर होत नाही. वरिष्ठ अधिकारी कोणाचेही ऐकत नाहीत त्यामुळे दिव्यांग,निराधार,विधवा महिलांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत.
प्रहार जनशक्ती पक्षाने आज काढलेलेया मोर्चाद्वारे महापुरुषांनाच विनंती केली की,आता आपणच परत या आणि आमचे प्रश्न मार्गी लावा.आजच्या मोर्चेकऱ्यांनी कोणालाही या बाबत निवेदन न देता आपली व्यथा आपल्याच महापुरुषांच्या समोर मांडली आणि ,मोर्चा समाप्त झाला.