जमीर बेगचा खून करणाऱ्या एकाला पाच दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-जमीर बेग या रिक्षा चालकाचा खून करणाऱ्या आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी योगेशकुमार राहंगंडाळे यांनी पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.6 जुलै रोजी जमीर बेग आरजू बेग या रिक्षा चालकाला जिजामाता हॉस्पीटलजवळ 100 रुपयांची मागणी केली. पण रिक्षा चालकाने दिले नाही म्हणून त्याला धार-धार शस्त्राने मारहाण केली. त्याच्या पोटात गंभीर जखमा झाल्या. या प्रकरणातील जखमी जमीर बेग उपचार सुरू असतांना मरण पावला. त्यामुळे या गुन्ह्याचा प्रकार खूनात बदलला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर वजिराबाद पोलीसांनी या आरोपींचा शोध घेतला आणि त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा पोलीस पथकावर आरोपींनी हल्ला केला. त्यांच्याकडे धार-धार शस्त्र असल्याने पोलीस अंमलदार व्यंकट गंगुलवार यांनी आपल्या पिस्तुलमधून एक गोळी आरोपीच्या पायावर झाडली आणि पळून जाणारा जमीर बेगचा मारेकरी सोनु सिंग उर्फ सोनु भोंग राजेंद्रसिंग चव्हाण (20) यास आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकास पकडले.
आज दि.28 जुलै रोजी वजिराबाद पोलीसांनी सोनु भोंगला न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी योगेशकुमार राहंगंडाळे यांनी सोनु भोंगला पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *