एक उपचार घेत आहे, एक अटक आहे, एक विधीसंघर्षग्रस्त बालक
नांदेड(प्रतिनिधी )- पोलीसांवर जीव घेणा हल्ला केल्याप्रकरणी पोलीस अंमलदार व्यंकट गंगुलवार यांच्या तक्रारीवरुन तीन जणांविरुध्द जीवघेणा हल्ला या सदरात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दि.27 जुलै रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास माळटेकडीच्या पुलाजवळ आरोपींना पकडतांना आरोपींनी त्यांच्यावर घातक शस्त्रांनी हल्ला केला. तेंव्हा पोलीस पथकातील व्यंकट नागनाथ गंगुलवार यांनी आपल्या पिस्तुलमधून आरोपींवर एक गोळी चालवली ती एक आरोपी दिपक अर्जुन पवार याच्या पायावर लागली आणि ते गोळी लागल्यावर सुध्दा मोटार क्रमांक एम.एच.30 बी.जे.9228 वर बसून पळून गेला. या प्रकरणी विमानतळ पोलीसांनी आकाश गोविंदराव लुळे, दिपक अर्जुन पवार आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक या तिघांविरुध्द भारतीय दंडसंहितेच्या कलम 307 नुसार गुन्हा क्रमांक 240/2021 दालख केला आहे. या प्रकरणाचा तपास विमानतळचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आनलदास हे करीत आहेत.
पोलीसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तिघांविरुध्द गुन्हा दाखल