नांदेडमधील गॅंगवारला पुर्ण विराम लावण्यासाठी द्वारकादासच आवश्यक
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये सुरू असलेल्या गॅंगवारला स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्यावतीने आज अल्पविराम लावला आहे. या गॅंगवारला पुर्ण विराम लागेपर्यंत चिखलीकरांची नियुक्ती स्थानिक गुन्हा शाखेत असावी तर नक्कीच ते पुर्ण विराम लावतील. कारण गॅंगवारला पुर्ण विराम लागला नाही तर नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता या गुन्हेगारांची बळी ठरत आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेल्या आठ मारेकऱ्यानंतर त्यांनी केलेले दरोडे, खून, खूनाचे प्रयत्न असे अनेक प्रकार उघडकीस आले. सोबतच खंडणीचे अनेक प्रकार आहेत. त्यात अनेकांनी तक्रार दिलेली नाही. या परिस्थितीत या गुन्हेगारांना मिळणारे मोकळे रान त्यांना जनतेवर दहशत गाजविण्यासाठी भरपूर आहे.त्यामुळे जनतेतील दहशत कमी करण्याची जबाबदारी पोलीसांचीच आहे. पण कांही या मारेकऱ्यांचे आणि खंडणीखोरांचे लागे बांधे असलेले व्यक्तीमत्व नांदेडमध्येच जगतात. त्यामुळे हे खंडणीखोर, गुन्हेगार आपले धेय गाठण्यात यशस्वी ठरतात आणि सर्वसामान्य जनता त्यात भरडली जाते. हा प्रकार मागच्या चार वर्षात जास्त झाला. त्यापुर्वी असे प्रकार जास्त घडत नव्हते. एखाद्या गुन्हेगाराने आपले इप्सीत साध्य करतांना त्याला आवश्यक असणारी आर्थिक मदत तो दरोड्याचे गुन्हे, खंडणीचे गुन्हे करून मिळवतो आणि त्यानंतर एखादा मोठा गुन्हा करून कुठे तरी लपून बसतो आणि पुन्हा कांही दिवसांनंतर रस्त्यावर येतो आणि पुन्हा एकदा आपले चक्र सुरूच ठेवतो.
विक्की चव्हाण खून प्रकरणातील सर्वच गुन्हेगारांना स्थानिक गुन्हा शाखेने पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या सक्षम नेतृत्वात जेरबंद केले. विक्की ठाकूर खून प्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेवर आक्षेप घेणाऱ्या कांही जणांच्या तोंडावर चांगलीच चापट मारतांना त्यांनी आठ मारेकरी अटक केले. जवळपास दोन्ही गॅंगमधील 30 गुन्हेगार तुरूंगात पाठविण्याचे श्रेय चिखलीकरांनाच आहे. मागे स्थानिक गुन्हा शाखेच्या पांडूरंग भारती या अधिकाऱ्याने एका गुन्हेगाराला यमसदनी पाठवले होते. त्यानंतर गुन्हेगारांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली होती. ही दहशत संपली कशी हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. मागे 20 वर्षापुर्वी कांही पोलीस अधिक्षक सांगत असायचे की, या जगात सर्वात मोठा गुंड माझा पोलीसच असावा. 20 वर्षापुर्वी आणि आजच्या काळात झालेल्या बदलामुळे आज बहुदा असे कोणत्या पोलीस अधिक्षकाला म्हणता येणार नाही . पण आपली जरब कायम राखण्यात ते नक्कीच नवीन मार्गांचा शोध घेवून त्याचा अवलंब करतील तर गुन्हेगारांमध्ये सुध्दा पोलीसांची दहशत तयार होण्याच वेळे लागणार नाही. पोलीसांनी फक्त आपली जबाबदारी पुर्ण करतांना त्यात पारदर्शकता, धैर्य, इमानदारी आणि निष्ठा राखणे आवश्यक आहे.
गोळ्या मारणाऱ्या गुन्हेगारांकडे हत्यारे कुठून आली त्याचा शोध होणे आवश्यक आहे. एवढ्या सहजपणे चार-चार गावठी कट्टे वापरून एक खून केला जातो आणि त्याबद्दल माहिती पोलीसांना मिळत नाही यामध्ये कुठे तरी पाणी मुरते आहे असे म्हणावेच लागते. गोळ्यांची दहशत माजविणारे जवळपास 30 गुन्हेगारा द्वारकादास चिखलीकर यांनी गजाआड केले आहेत. शासनाने एकानियुक्तीत मिळणारा त्यांचा हक्काचा कार्यकाळ पुर्णपणे द्यवा असे यानंतर लिहावेच लागेल.
शहरात 11 वी, 12 वीमध्ये शिकणाऱ्या बालकांचा छळ सुध्दा मोठा होतो. त्यात कांही गुन्हेगार पोलीसांच्या सोबत बसून चहा-पाणी घेतात, मी खुप चांगला सामाजिक कार्यकर्ता आहे असे दाखवतात पण पोलीसांनी आपल्या गुप्तहेर यंत्रणेमार्फत त्याची बारकाईने चौकशी करावी आणि बाहेरून नांदेडमध्ये आपल्या शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबवावा हे सुध्दा याच निमित्ताने मांडण्याची गरज आहे. श्रीकृष्णाने जरासंघाला मृत्यूदंड दिला होता तेंव्हा त्याच्या तोंडातील 101 क्रमांकाचा वाईट शब्द बाहेर निघू दिला नव्हता आणि एका क्षणात त्याचे शिर धडावेगळे केले होते. हे करत असतांना श्रीकृष्ण स्मितहास्य करत होते. कारण त्यांना माहित होते की, जरासंघ असे करणार आहे तरी पण मला 100 शब्दांपर्यंत गप्प बसायचे आहे आणि 100 शब्दानंतर त्याचा वध करायचा आहे. जरासंघाशी झालेल्या अनेक युध्दांमध्ये एकदा श्रीकृष्ण पळून गेले होते. त्यामुळेच त्यांच्या एक हजार नावांमध्ये एक नाव रणछोडदास असेपण आहे. श्रीकृष्णाच्या एक नावामध्ये एक नाव द्वारका हे त्यांचे नाव आहे. आणि द्वारकादास हे श्रीकृष्णाच्या सेवकाचे नाव आहे. त्यामुळे कृष्णाच्या जीवनात घडलेल्या परिस्थितींना पुन्हा एकदा वाचून द्वारकादास सुध्दा कांही तरी प्रयत्न करतील अशी आशा आहे. आजच्या परिस्थितीत पोलीसांना रणछोडदास होण्याची गरज नाही. कारण श्रीकृष्णाप्रमाणे त्यांना कांही माहित नाही पण भारतीय प्रक्रिया संहिता जे अधिकार पोलीसांना देत आहे त्यानुसार सर्वसामान्य नागरीकाची रक्षा करणे त्यांचे आद्य कर्तव्य आहे.
नांदेडमधील गॅंगवारला पुर्ण विराम लावण्यासाठी द्वारकादासच आवश्यक