नांदेड पोलीस परिक्षेत्रातील 7 वरिष्ठ श्रेणी लिपिक आणि 14 कनिष्ठ लिपीकांच्या चार जिल्हा अंतर्गत बदल्या

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी 28 जुलै रोजी जारी केलेल्या आदेशात सात वरिष्ठ श्रेणी लिपीक आणि 14 कनिष्ठश्रेणी लिपीकांना आपल्या अखत्यारीतील चार जिल्ह्यांमध्ये बदल्या दिल्या आहेत.
नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी प्रशासकीय कारणावरुन नांदेड पोलीस परिक्षेत्रातील सात वरिष्ठ श्रेणी लिपीकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यांच्या नवीन नियुक्तीचे ठिकाण कंसात लिहिले आहे. एस.व्ही.राऊत-परभणी (नांदेड), श्रीमती आर.आर.पाथरकर-नांदेड(हिंगोली), ए.एम.कवठाळे-लातूर(नांदेड), सौ.एम.एम.लुंगारे-नांदेड(हिंगोली), ए.डी.बैनवाड-नांदेड(परभणी), टी.व्ही.गोरे-लातूर(रा.रा.पो.ब.ल.गट-12 हिंगोली), सौ.ए.एच.कत्तलाकुट्टे-लातूर(पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येेथे एक वर्ष स्थगिती).
14 कनिष्ठ श्रेणी लिपीकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत. आर.डी.असोरे-परभणी (नांदेड), श्रीमती आर.आर.काळे-नांदेड(हिंगोली), पी.एस.अंतापुरकर-नांदेड(हिंगोली), श्रीमती ए.एन.दंडे-लातूर(हिंगोली), आर.जी.वाघदरे-लातूर(परभणी), पी.आर.मोहिते-नांदेड(परभणी), व्ही.के.कांबळे-हिंगोली(रारापोबल गट -12हिंगोली), सौ.आर.डी.मईंग-हिंगोली(रारापोबल गट -12 हिंगोली), के.यु.मोरे-नांदेड (रारापोबल गट -12 हिंगोली), डी.बी.तेलंगे-नांदेड (हिंगोली), एस.बी.नागरे-नांदेड (परभणी), आर.के.चव्हाण-नांदेड(पोप्रवि बाभुळगाव लातूर), सौ.एस.जी.कुंटूरकर-नांदेड(पोलीस अधिक्षक कार्यालय परभणी येथे एक वर्ष स्थगिती), सौ.सी.एस.भरकड-नांदेड (परभणी).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *