नांदेड(प्रतिनिधी)- लंगर साहिब गुरुद्वारा तर्फे आयोजित सालाना बरसी निमित्त दि 3 आणि 4 ऑगस्ट रोजी नगीना घाट (नांदेड) येथील संत बाबा निधान सिंघ जी मेमोरियल हॉस्पिटल येथे मोफत दन्त चिकित्सा आणि फिजियोथेरेपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षीची बरसी २,३,४ ऑगस्ट दरम्यान लंगर साहिब मध्ये साजरी होणार आहे. लंगर साहिबचे संस्थापक संत बाबा निधानसिंघजी, संत बाबा हरणामसिंघजी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शीशासिंघजी कारसेवावाले यांची सालाना बरसी असून लंगर साहिबचे प्रमुख जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघ आणि संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या मार्गदर्शननाखाली हा उत्सव साजरा होतो आहे. बरसी निमित्त विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. बरसी उत्सवाची जय्यत तयारी होत आली आहे. लंगर साहिब गुरुद्वाराच्या विविध सामाजिक उपक्रम आणि सेवा नांदेडकरांसाठी भूषण आहेतच. बरसी च्या निमित्ताने 3 व 4 ऑगस्ट रोजी नांदेड येथे मोफत दन्त चिकित्सा आणि फिजियोथेरेपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मोफत उपचार केले जाणार आहेत अशी माहिती डॉ.बाबा हरजींदरसिंघ व डॉ.पी.जे.बोटलवार यांनी दिली. दंत चिकित्सक डॉ. सुरेश दागडीया B.D.S.,डॉ. नेहा शिंदे B.D.S.,डॉ. वृन्दा मालीवाल B.D.S.,डॉ. मिसेज भोकरे B.D.S., डॉ. नेहा उमरेकर B.D.S.हे आणि फिजीयोथेरेपी चिकित्सा डॉ. राजेन्द्र पाटील,डॉ. आदित्य मिस्कीन,डॉ. भार्गवी,डॉ.गणेशा कदम,डॉ.संपदा,डॉ. मयूरी हे उपचार करणार आहेत. शिबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुद्वारा लंगर साहिबचे प्रमुख जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघ आणि संत बाबा बलविंदरसिंघ यांनी केले आहे.