नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका 25 वर्षीय युवकाला पकडल्यानंतर त्याने चोरी केलेले 10 मोबाईल किंमत 1 लाख 5 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस अंमलदार दिलीप राठोड, शेख लियाकत, दत्तात्रय कांबळे, बालाजी रावळे, शिवशंकर बामणे, विशाल अटाकोरे, काकासाहेब जगताप हे दि.30 जुलै रोजी गस्त करत असतांना नई अबादी भागात एक युवक कांही मोबाईल बाळगुण आहे अशी खबर त्यांना मिळाली. पोलीसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले. त्याचे नाव मोहम्मद रशीद मोहम्मद सईद (25) रा.खडकपुरा असे आहे. त्याच्या ताब्यात विविध ठिकाणी चोरी केलेले 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचे 10 मोबाईल सापडले आहेत. त्याच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 नुसार कार्यवाही करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस अंमलदार मठदेवरू आणि राजेश राठोड करीत आहेत.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे या अधिकाऱ्यांनी गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे.
शिवाजीनगर पोलीसांनी दहा चोरीचे मोबाईल पकडले