नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्रासह देशभरातून विविध मान्यवरांनी भ्रमणध्वनीवरून आणि प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. खासदार चिखलीकर यांच्यावर अक्षरशः अभिष्टचिंतनाचा वर्षाव झाला. यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर असणारे लोक नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस आज नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी वाढदिवसावर खर्च न करता पूरग्रस्तांसाठी मदत निधी द्यावा असे आवाहन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले होते .त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात आज खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले. वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, देशाचे गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, राज्यपाल भगतसिंग कोशियारी, सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, खा.सुप्रियाताई सुळे, लातूरचे खा.सुधाकरराव श्रंगारे, भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, राष्ट्रवादीचे माजी मंत्री खा.प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी मंत्री सूर्यकांताताई पाटील, माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, खा. उनमेश पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, आयुक्त गणेश देशमुख, माजी आ.बापूसाहेब देशमुख गोरठेकर, आ.मेघनाताई बोर्डीकर, उमरग्याचे आ.ज्ञानराज चौगुले, नांदेड उत्तरचे आ.बालाजीराव कल्याणकर, मुखेडचे आ.तुषार राठोड किनवटचे आ.भीमराव केराम, पुण्याचे माजी आ.जगदीश मुळीक, माजी आ.सुभाषराव साबणे, माजी आमदार भाऊसाहेब गोरेगावकर, म्हाडाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर, ठाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील, अपर जिल्हाधिकारी पंकजराव देवरे, मीरा-भाईंदरचे उपआयुक्त संजय शिंदे, कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ.सुभाष जाधव, मुंबईचे उपजिल्हाधिकारी संतोष जाधव, भाजपा संघटन मंत्री भाऊराव देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले, भाजपा संघटन मंत्री संजय कौडगे, माजी जि.प.सदस्य धर्मराज देशमुख, लोह्याचे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी सभापती गणेशराव करखेलीकर, कृषी उत्पन्न बाजार समिती धर्माबादचे सभापती राम पाटील बन्नाळीकर, लोहा नगरपालिकेचे उपाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष शरद पवार, कंधार नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन , श्रावण पाटील भिलवंडे यांच्यासह अनेकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा,फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांच्या खा.चिखलीकर यांना शुभेच्छा