नांदेड(प्रतिनिधी)- वजिराबाद गुन्हे शोध पथकाने एका गिफ्ट सेंटरवरून 31 तलवारी आणि 16 खंजर जप्त केले आहेत. या व्यक्तीविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी योगेशकुमार राहंगडाळे यांनी त्या व्यक्तीला एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.2 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता वजिराबादचे येथील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे, पोलीस अंमलदार गजानन किडे, मनोज परदेशी, संतोष बेल्लूरोड, शेख इम्रान, शरदचंद्र चावरे, व्यंकट गंगुलवार, चंद्रकांत बिरादार यांनी सुखमनी गिफ्ट सेंटर येथे छापा टाकला तेंव्हा त्या ठिकाणी 31 तलवारी किंमत 28 हजार 700 रुपये आणि 16 खंजर किंमत 5 हजार 400 रुपये अशी घातक हत्यारे जप्त केली. याबाबत पोलीस अंमलदार बालाजी कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जसवंतसिंघ प्रतापसिंघ सुखमनी (48) रा.अबचलनगर नांदेड याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
वजिराबाद पोलीसांनी 31 तलवारी आणि 16 खंजर पकडले