नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रा
राज्यपाल सचिवालयाने पाठवलेल्या संदेशानुसार 5 ऑगस्ट रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नांदेडकडे रवाना होतील. सकाळी 10 वाजता नांदेड विमानतळलावर आगमन होईल. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडे जातील. ऑनलाईन बैठक घेवून स्वारातीमची संपुर्ण माहिती घेतील. त्यानंतर जलपुर्नरभरण कार्यक्रमांची पाहणी करतील. त्यानंतर गुरू गोविंदसिंघजी अध्ययन संकुल आणि संशोधन केंद्राला भेट देतील. त्यानंतर मुलींच्या वस्तीगृहाचे उद्घाटन करतील. त्यानंतर मुलांच्या वस्तीगृहाचे उद्घाटन करतील. जैव विज्ञान उद्यानाला भेट देतील. दुपारच्या सत्रात तख्त सचखंड श्री हजुर साहिब येथे जातील दर्शन घेतील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात येतील आणि सायंकाळी 5 वाजता पुन्हा विश्रामगृहात पोहचतील आणि रात्रीचा मुक्काम नांदेड येथे राहिल.
6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता गाडीने जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या कार्यालयाकडे रवाना होतील. तेथे सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. दुपारी 2 वाजता गाडीने परभणीकडे रवाना होतील आणि 4 वाजता परभणी येथे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे जातील आणि त्या विश्रामगृहात मुक्काम करतील. 7 ऑगस्ट रोजी वसंतराव नाईक यांना अभिवादन करतील. नंतर बांबू प्रकल्पाला भेट देतील. त्यानंतर शेती क्षेत्रातील उच्च शिक्षण प्रकल्पाची पाहणी करतील. फुड सायन्स आणि टेक्नॉलाजीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतील. त्यानंतर महिला वस्तीगृहात जातील आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर कृषी विद्यापीठाच्या वाचनालयास भेट देतील. दुपारी 3.30 वाजता परभणी येथून नांदेडकडे रवाना हातील आणि दुपारी 4 वाजेच्यासुमारास ते मुंबईकडे रवाना हातील.
या दौऱ्यात राज्यपाल महोदयांसोबत राकेश नाथानी, विशाल आनंद, लेफ्टनंट अमद्रेंसिंघ, प्राची जांभेकर आणि कमल घिडीयाल हे अधिक उपस्थितीत असतील. नांदेड, परभणी, हिंगोली, येथील जिल्हाधिकाऱ्यांना या दौऱ्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा 5,6 व 7 ऑगस्ट रोजी नांदेड-हिंगोली आणि परभणी दौरा