नांदेड(प्रतिनिधी)- सालाना बरसी निमित्त नांदेड येथे आलेल्या पंजाबी पत्रकारांचा गुरुद्वारा तर्फे सत्कार सत्कार करण्यात आला. वरिष्ठ पत्रकार सरदार रूपींदरसिंघ शामपुरा यांच्या नेतृत्वाखाली पंजाबी पत्रकारांची टिम बरसी कार्यक्रमाचे कव्हरेज करण्यासाठी आलेली आहे..

पंजाबी पत्रकारांच्या टीमने बुधवारी सचखंड गुरुद्वारास भेट दिली, यावेळी त्यांचे गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक सरदार गुरविंदरसिंघ वाधवा यांनी स्वागत केले. त्यांचा शिरोपाव देऊन सत्कार करण्यात आला. नानक साई फाउंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे हे यावेळी उपस्थित होते. सरदार रूपिंदरसिंघ श्यामपुरा,सरदार जोगिंदरसिंघ मास्टर, सरदार मंजित सिंघ,सरदार जितासिंघ कालो, सरदार बलजीतसिंघ ढिल्लो ,सरदार मणबीरसिंघ रणधवा,धनंजय उमरीकर, सरदार जसदीपसिंघ अरोरा यांना गुरुद्वारा बोर्डाचे वतीने सन्मानित करण्यात आले.

दरम्यान त्यांचा लंगर साहिब तर्फे हि संत बाबा नरेंद्र सिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या हस्ते बरसी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.पंजाबी पत्रकार मित्रांना आज नांदेड येथिल बरीच पत्रकार मंडळी भेटली, भेटीत मराठी पत्रकारिता बाबत त्यांनी गौरवास्पद मत व्यक्त करत मराठी पत्रकारितेला मोठा इतिहास असल्याचे सांगितले, मराठी पत्रकार बंधूंना त्यांनी पंजाब येण्याच निमंत्रण पण दिले..
