नांदेड(प्रतिनिधी)-एका वकीलाचा साखरपुडा झाल्यानंतर लग्नाअगोदरच होणाऱ्या पत्नीने वकीलाविरुध्द अत्याचाराची तक्रार दिली आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत नदी काठी असलेल्या वस्तीमध्ये गौतम किणीकर नावाचे व्यक्ती राहातात. प्राप्त माहितीनुसार ते वकीली व्यवसाय करतात. त्यांचा कांही दिवसांपुर्वी एका युवतीसोबत साखरपुडा झाला होता. पण आज त्या युवतीने लग्नाअगोदरच वकिलांनी माझ्यावर अत्याचार केला अशी तक्रार वजिराबाद पोलीस ठाण्यात आली आहे. वृत्तलिहिपर्यंत हा गुन्हा दाखल झाला नव्हता. पण प्रक्रिया सुरू होती.