नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने पोलीस ठाणे लिंबगाव येथे जबरी चोरी करणाऱ्या लोकांचा शोध लावून त्यातील दोघांना पकडले. त्यातील एक विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. दुसऱ्याला 9 व्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.आर.बडवे यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.28 जून रोजी आदेश धोंडोपंत हनुमंते या युवकाची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एक्स.8870ही त्याच्या समोरच चोरट्यांनी लिंबगाव येथून चोरली. आपली गाडी आहे हे पाहताच त्याने आणि त्याच्या तिन मित्रांनी त्या गाडीचा पाठलाग केला तेंव्हा वाघी तांडा ते वाघी रस्त्यावर चोरी केलेली दुचाकी गाठली. आपल्या गाडीची विचारपुस करीत असतांना त्या गाडीवरील तिघांनी चाकूने मारहाण करून तीन्ही मित्रांचे मोबाईल चोरले. याबाबत लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा क्रमांक 51/2021 कलम 392, 34 भारतीय दंडसंहितेनुसार दाखल झाला.
जिल्ह्यातील कोणत्याही गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचा अधिकार असल्यामुळे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या विभागातील पोलीस अधिकारी आशिष बोराटे, पोलीस अंमलदार जसवंतसिंघ शाहु, गंगाधर कदम, रुपेश दासरवाड, विलास कदम, गणेश धुमाळ, विठ्ठल शेळके, मोतीराम पवार, रवि बाबर, गजानन बैनवाड अशा जबरदस्त पथकाला पाठवून रोहन पुरभाजी ढवळे रा.वसरणी यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे लिंबगाव येथून चोरलेले दोन मोबाईल सापडले. हे मोबाईल त्याने दुसऱ्या माणसाकडून घेतले होते अशी माहिती दिली. त्याला ताब्यात घेतले. तो विधीसंघर्षग्रस्त बालक होता.
आज दि.7 ऑगस्ट रोजी गुन्हा क्रमांक 51 चे तपासीक अंमलदार पोलीस उपनिरिक्षक ए.एम.केंद्रे, पोलीस अंमलदार धोंडगे, खंडागळे, पेद्देवाड, निवृत्ती रामबैनवाड यांनी पकडेल्या रोहन पुरभाजी ढवळेला न्यायालयात हजर केले. या प्रकरणात अमरदिपसिंघ संधू, राज ठाकूर आणि चव्हाण या तिन इतर चोरट्यांना शोधणे आहे असे सांगून पोलीस कोठडी मागितली. न्यायाधीश एस.आर.बडवे यांनी रोहन ढवळेला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दरोड्यातील एकाला तीन दिवस पोलीस कोठडी ;स्थानिक गुन्हा शाखेने पकडला होता दरोडेखोर