नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीचे नेते दिलीप कंदकुर्ते यांच्या जन्मदिनानिमित्त तरोडा येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कैलास सावते यांनी लहान बालकांना शालेय साहित्य वाटप करून दिलीप कंदकुर्ते यांचा जन्मदिन साजरा केला.
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि नांदेड मर्चंटस् कोऑपरेटीव्ह बॅंकेचे अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या जन्मदिनानिमित्त तरोडा(बु) भागातील सम्यक बुध्द विहार अरुणोदय नगर येथे कैलास सावते यांनी लहान बालकांना त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी असणारे साहित्य वाटप करून दिलीप कंदकुर्ते यांचा जन्मदिन साजरा केला.
या कार्यक्रमात आयोजक कैलास सावते, स्वप्नील गुंडावार, बबलू यादव, आशुतोष जोशी, स.परमविरसिंघ मल्होत्रा, विशाल संपतवार, सुहास कांबळे, राजू कांबळे, रतन लोखंडे, आतिश जाधव, कुणाल कांबळे, नितीन कांबळे, लक्ष्मीकांत तेले, निखील तुंबे, अभिजित कांबळे, अक्षय हनवते यांच्यासह मित्रमंडळ व कार्यकर्ते उपस्थित होते.
कैलास सावते मित्र मंडळाने दिलीप कंदकुर्ते यांचा जन्मदिन साजरा करतांना बालकांना शैक्षणिक साहित्य दिले