नांदेड,(प्रतिनिधी)- प्रहार जनशक्ती पक्ष आयोजित महानगर प्रमुख सरदार प्रितपाल सिंघ शाहू यांच्या वाढदिवसानिमित्त आणि पक्ष सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम कार्यक्रम हा महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण सुरु झाला. क्रांती दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी राजे,शहीद भगतसिंघजी ,राजगुरूजी आणि सुखदेवजी यांच्या सह यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांनी केले.

सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन जनार्दन शेजुळे सेवानिवृत्त बीएसएफचे जवान तसेच मराठा रेजिमेंट मधून सेवा निवृत्त झालेलेगजानन देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल , उद्योजक बॉबी सेठ ,जिल्हाप्रमुख विठ्ठल देशमुख तसेच इतर जेष्ठ मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम हा राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला . सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, युवा आघाडी , जिल्हयातील महिला आघाडी सर्व तालुका अध्यक्षा, यासह नांदेड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व महानगरप्रमुख प्रीतपालसिंघ शाहू यांचे सर्व मित्र मंडळ अजय हनुमंते , मल्लिकार्जुन चाकोते ,राजेश तलवारे, सतीश कल्याणकर ,लक्की भट्टि, सुनील लाला, गुरूदयाल सिंग सपुरे ,प्रेमजित सिंघ लांगरी, संतोष पतंगे, शिवाजी बेडगे, सोनू खालसा , संतोष बोराळकर,कंथक सुर्यतळ , सुजय पाटील, समर्थ खंडेलवाल, बालाजी हतगले या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात श्री गुरु गोविंदसिंघजी रक्तपेढीच्या सेवकांनी मेहनत घेतली. आजच्या रक्तदान शिबिरात एकूण ९२बाटल्या रक्तदान झाले. प्रितपालसिंघ शाहू यांच्या वतीने दरवर्षी होणार हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम प्रशंसनीय आहे.