नांदेड.(प्रतिनिधी)- तिरकसवाडी ता.मुदखेड येथे एक नवऱ्याने आपल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून तिचा खून केल्याची घटना घडली आहे.जखमी महिला चालत दवाखाना बारड येथे गेली होती असे सांगण्यात आले.
तिरकसवाडी ता.मुदखेड येथे ज्ञानेश्वर शिंदे आपली पत्नी ताई आणि एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यासोबत राहतात.ज्ञानेश्वर शिंदे हे पुण्यात काम करतात.पती पत्नीमध्ये मागे भांडण झाले होते.दोन दिवसांपूर्वीच ज्ञानेश्वर शिंदे तिरकसवाडी येथे आले होते.आता मागचे सर्व विसरून चांगले जगायचे हे ठरले होते.आणि संसार गाडा चालत होता.
काल दिनांक ९ ऑगस्ट रोजी रात्री शिंदे कुटुंबीय झोपल्या नंतर ज्ञानेश्वर शिंदेने ताई शिंदेच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला.जखमी झालेली ताई शिंदे (२९)पायी चालत बारड येथील दवाखान्यात पोहचली होती. पण उपचार सुरु होण्याअगोदरच ती मरण पावली असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
पत्नीचा मारेकरी ज्ञानेश्वर शिंदे गायब झाला आहे.गावातील मंडळी,अनेक पोलीस अंमलदार आणि बारडचे सहायक पोलीस निरीक्षक एस.आर.तुगावे रात्रभर पासून मारेकरी ज्ञानेश्वर शिंदेचा शोध घेत आहेत.