नांदेड,(प्रतिनिधी)- अर्धापूर शहरात जातीय दंगल घडवणाऱ्या दंगेखोरांमध्ये नाव असलेल्या काँग्रेस नागरसेवकासह तीन जणांचा अटक पूर्व जामीन अर्ज पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एन,गौतम यांनी फेटाळून लावला आहे.
दिनांक ३० जून २०२१ रोजी अर्धापूर शहरात व्यायामशाळेत वाद झाला. तो वाद दोन्ही युवकांनी अर्धापुरच्या रस्त्यावर आणला. मग त्या वादात आपली पोळी भाजून घेणारे उतरले आणि त्या वादाचे स्वरूप जातीय दंगलीत बदलले. पोलिसांनी दाखल केलेल्या प्राथमिकी मध्ये ५१ जणांची नावे आहेत.आता पर्यंत या प्रकरणी अर्धापूरचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ९ दंगलखोरांना पकडले आहे.सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
अर्धापूर येथील नगरपालिकेत काँग्रेस पक्षाच्यावतीने नगरसेवक बनलेले मुख्तदिरखान सिकंदरखान पठाण,त्यांचे बंधू शाहबाजखान सिकंदरखान पठाण यांची सुद्धा नावे पोलीस प्राथमिकीमध्ये आहेत.त्यांनी नांदेडच्या जिल्हा न्यायालयात एमसीए क्रमांक ५४६/२०२१ दाखल केला.तसेच शेख आमेर शेख सलीम यांनी अर्ज क्रमांक ५८९/२०२१ दाखल केला.याप्रकरणी तिघांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.याबाबत आपले म्हणणे से च्या माध्यमाने पोलीस निरीक्षक अशोक जाधव आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार गुरुदास आरेवार यांनी न्यायालयात सादर केले. सरकारी वकील ऍड.रणजित देशमुख यांनी युक्तिवादात मुख्तदिरखान सिकंदरखान पठाण,त्यांचे बंधू शाहबाजखान सिकंदरखान पठाण यांच्या विरुद्ध अगोदरचे पण गुन्हे दाखल आहेत.तसेच शेख आमेर विरुद्ध सुद्धा गुन्हे असल्याची माहिती न्यायालयास सांगितली.तसेच मुख्तदिरखान सिकंदरखान पठाण,त्यांचे बंधू शाहबाजखान सिकंदरखान पठाण यांच्या कडून दंगल घड्वताना वापरलेल्या तलवारी आणि शेख आमेर कडून लोखंडी रॉड जप्त करणे आहे,असे सांगितले. युक्तिवाद ऐकून न्या. गौतम यांनी या तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.