नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली बसस्थानकावर एका 65 वर्षीय महिलेला गोड-गोड बोलून तिच्या गळ्यातील एक तोळ्याचे मनी ठकसेनाने नेल्याचा प्रकार घडला आहे.
लक्ष्मीबाई नागोराव कवडे (65) रा.सावळी ता.बिलोली यांना नवीन बसस्थानक बिलोली येथे एक भामटा भेटला आणि म्हणाला मी तुम्हाला 60 वर्षाचे पैसे मंजुर करून देतो त्यासाठी 1200 रुपये द्या पण माझ्याकडे पैसे नाहीत असे लक्ष्मीबाईने सांगितले. तेंव्हा त्याने दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी जाऊन त्यांना तुझ्या गळ्यातील सोन्याचे मनी दे मी तुझे पैसे मंजुर करून देतो असे सांगितले आणि लक्ष्मीबाईच्या गळ्यातील 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मनी एक तोळ्याचे विश्र्वासघात करून फसवणूक केली आहे. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक सय्यद अधिक तपास करीत आहेत.
65 वर्षीय महिलेची फसवणूक करून 30 हजारांचे सोन्याचे मनी ठकसेनाने नेले