नांदेड(प्रतिनिधी)-कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर इंदौर कंपनीचे मुरूम वाहुन नेणारे टिपर अडवून 15 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या विरुध्द मुदखेड पोलीसांनी गुन्हा नोंदविला आहे.
मोतीलाल रामचंद्र वाकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे रस्त्याच्या कामासाठी मुरूम वाहून नेणारे टिपर अनेका अडवून मला 15 लाख रुपये द्या नाही तर मी तुम्हाला काम करू देत नाही अशी बेकायदेशीर खंडणी मागणाऱ्या पापाराव पंडीत चव्हाण रा.राजवाडी ता.मुदखेड याच्याविरुध्द मुदखेड पोलीसांनी गुन्हा क्रमांक 141/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 341, 384 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पोलीस निरिक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार गिते हे करीत आहेत.