
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडचे बसस्थानक कापूस संशोधन केंद्र बाफना येथे हलविण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि बसस्थान हलवू नये याबाबीचे “राजकारण’ पण सुरू झाले. या सर्व प्रकरणात बसस्थानक आज नाही तर उद्या स्थानांतरीत होणारच आहे. असे जेंव्हा होईल तेंव्हा नांदेड जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीने बनविलेले बसस्थानक डीझाईन त्यासाठी वापरले जावे असे वाटते.

नांदेड शहरातील मुख्य बसस्थानक कापूस संशोधन केंद्र बाफना येथे हलविण्यात बाबत तयारी झाली आणि याबाबत “राजकारण’ सुरू झाले. बसस्थानक दुसरीकडे गेले तर नक्कीच कांही जणांच्या रोजी रोटीचा प्रश्न तयार होणार आहे. यात दुमत असू शकत नाही पण नांदेडची वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहतूक लक्षात घेता बसस्थानक दुसरीकडे गेलेच पाहिजे यालाही कोणी नाकारू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये बसस्थानक जाईल तेंव्हाचा प्रश्न आहे. बसस्थानकासाठी काूपस संशोधकाची जागा खुप वर्षापुर्वी सुनिश्चित केलेली आहे. त्यामुळे आज त्यावर चर्चा करून त्या बसस्थानकाच्या विषयाला उगीचच हवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नांदेड शहरातील बसस्थानक दुसरीकडे हलणार असेल तर त्यासाठी नवीन बसस्थानकाचे डिझाईन सुध्दा लागेल. या संदर्भाने नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी कमलाकर जायभाये यांची कन्या रोहिणी यांनी 10 ऑगस्ट रोजीच वास्तू शास्त्रज्ञ विषयातील पदवी पुर्ण केली आहे. पुढे त्या पदव्युत्तर शिक्षण घेणार आहेत. त्यांच्या अभ्यासक्रमादरम्यान पदवीच्या अंतिम वर्षात असतांना बसस्थानकाचे डिझाईन बनवले होते. त्यात त्यांना उत्कृष्ट असा शेरा मिळालेला आहे. नांदेडचे बसस्थानक तयार होणार असेल तर रोहिणी जायभाये यांनी तयार केलेले बसस्थानकाचे नवीन डिझाईन वापरायला हवे. या बसस्थानक डिझाईनमध्ये बस उभ्या करण्याचे फलाट, बाहेरची पार्किंग, बस पार्किंग, मेकॅनिक विभाग, पेट्रोलपंप अशा सर्व बाबी जोडून रोहिणी जायभाये यांनी तयार केलेले बसस्थानकाचे डिझाईन उत्कृष्ट आहे. नांदेड जिल्ह्यातील बसस्थानक तयार होणार असले तर नांदेडच्या भुमितील वास्तुशास्त्रज्ञ रोहिणी कमलाकर जायभाये यांचे डिझाईन वापरण्यात आले तर त्यांच्या शिक्षणाला शाब्बासकी दिल्या सारखे होईल.
