नांदेड.(प्रतिनिधी)- तिरकसवाडी ता.मुदखेड येथे आपल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून तिचा खून करून पळून गेलेल्या नवऱ्याला बारड पोलिसांनी ४८ तास पूर्ण होण्या अगोदरच गजाआड केले आहे.
दिनांक ९ ऑगस्ट रोजी रात्री शिंदे कुटुंबीय झोपल्या नंतर ज्ञानेश्वर शिंदेने ताई शिंदेच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला.जखमी झालेली ताई शिंदे (२९)पायी चालत बारड येथील दवाखान्यात पोहचली होती. पण उपचार सुरु होण्याअगोदरच ती मरण पावली असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
पत्नीचा मारेकरी ज्ञानेश्वर शिंदे पळून गेला होता.आज घटनेची माहिती प्राप्त झाल्यापासून ४८ तास पूर्ण होण्या अगोदरच बारड पोलिसानी ताई शिंदेचा मारेकरी नवरा ज्ञानेश्वर मारोती शिंदे (३२) यास ताब्यात घेतले आहे.