नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील शहिदपुरा भागातून एक 90 हजार रुपयांची दुचाकी चोरीला गेली आहे. तसेच पार्डी शिवारातून एक 40 हजार रुपयांची दुचाकी चोरीला गेली आहे.
कुलवंतसिंघ सुरजितसिंघ तबेलेवाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता त्यांनी शहिदपुरा भागात उभी केलेली त्यांची 90 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.बी.1067 ही एका तासात चोरीला गेली. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
राजूदास गोविंद चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुणाल धाब्याच्या बाजूला पार्डी शिवारात त्यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.वाय.7315 ही 40 हजार रुपये किंमतीची गाडी उभी करून नैसर्गिक विधीसाठी गेले आणि त्यांची गाडी चोरीला गेली ही घटना सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास घडली. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
1 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी चोरीला गेल्या