बोअरवेल व्यवसायिकाला खंडणी मागणारा पोलीस कोठडीत

नांदेड (प्रतिनिधी)-एका बोरवेल चालकाला खंडणी मागणाऱ्या एकाविरुध्द नंादेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याने दहा हजार रुपयांची खंडणी मागितली होती. या खंडणीखोराला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.बी.कुलकर्णी यांनी 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
बालाजी माधवराव सोनवळे रा.जुनाकौठा यांचा बोअरवेल व्यवसाय आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 ऑगस्टच्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास साईबाबा मंदिर कमानीजवळ त्यांच्या कार्यालयात अनिल श्रावण सोळंके (32) रा.जुनाकौठा हा व्यक्ती आला आणि त्याने खंजीरचा धाक दाखवून कौठ्यात राहायचे असेल तर मला दारु पिण्यासाठी दहा हजार रुपयांचा हप्ता दे नाही तुझा व्यवसाय करणे अवघड करतो अशी धमकी दिली. नांदेड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र.574/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार करीत आहेत.
आज दि.13 ऑगस्ट रोजी बिचेवार आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी पकडलेल्या अनिल श्रावण सोळंकेला न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडी मागितली. न्या.कुलकर्णी यांनी अनिल सोळंकेला तीन दिवस अर्थात 15 ऑगस्ट 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *