नांदेड(प्रतिनिधी)-डायल 112 च्या माध्यमाने नांदेडच्या नागरीकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधांचा उपयोग करत विद्युतगतीने उत्कृष्ट सेवा द्या असे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
नांदेड जिल्ह्यातील पोलीस दलाला डायल 112 या योजनेअंतर्गत जवळपास दीड कोटी रुपये खर्च करून 14 चार चाकी वाहने आणि 76 दुचाकी वाहने देण्यात आली. या वाहनांचे लोकार्पण करतांना अशोक चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ.विपीन, पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांची उपस्थिती होती. नवीन वाहनांचे पुजन करून त्या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

या प्रसंगी पुढे बोलतांना जलद प्रतिसाद देवा हीच नागरीकांसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. घटना घडताच पोलीस तेथे पोहचले पाहिजेत. आता 112 च्या माध्यमातून ज्येष्ठ नागरीक, महिला, लहान बालके आणि घडलेल्या घटनेला प्रतिसाद या सर्वांसाठी हा एकच टोल फ्री क्रमांक कार्यान्वीत करण्यात आला आहे. कोणालाही काही मदत आवश्यक असेल तर ती या माध्यमातून त्वरीत मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी म्हणाले. महाराष्ट्र आपात्कालीन प्रतिसाद योजनेअंतर्गत आज 14 चार चाकी वाहने आणि 76 दुचाकी वाहनांचा लोकार्पण सोहळा होत आहे. नांदेड जिल्ह्यात 545 अधिकारी आणि अंमलदार या कामसाठी प्रशिक्षीत करण्यात आले आहेत. गोल्डन अवर हा महत्वाचा क्षण असतो आणि त्या क्षणात आपातस्थितीत असलेल्या व्यक्तीला मदत देणे यासाठी 112 योजना काम करेल आणि नांदेड जिल्ह्याती नागरीकांना सुरक्षीत भावना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे निसार तांबोळी म्हणाले.


या कार्यक्रमात आ.बालाजी कल्याणकर,आ. मोहन हंबर्डे , आ.अमरनाथ राजूरकर, आ.राम पाटील रातोळीकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक विकास तोटावार, डॉ.सिध्देश्र्वर धुमाळ, शहरातील सर्व पोलीस निरिक्षक, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आणि राखीव पोलीस निरिक्षक शहादेव पोकळे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
