नांदेड(प्रतिनिधी)-एका 34 वर्षीय व्यक्तीने काळेश्र्वर मंदिराकडे जाणाऱ्या छोट्या पुलावरून गोदावरीच्या बॅक वॉटरमध्ये उड्डी मारून आत्महत्या केली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन लोकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सुमित्राबाई जिजाभाऊ मुटकुळे रा.दत्तनगर नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा संतोष जिजाभाऊ मुटकुळे (34) याने 15 ऑगस्टच्या सकाळी 11 ते 18 ऑगस्टच्या सकाळी 10.30 वाजेदरम्यान गणेश शिंदे रा.हरबळ ता.लोहा आणि गणेश येईलवाड रा.विष्णुपूरी या दोघांनी पैसे मागल्याच्या त्रासाला कंटाळून विष्णुपूरी येथील काळेश्र्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील छोट्या पुलावरून उडी मारून गोदावरीच्या बॅक वॉटरमध्ये आत्महत्या केली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 306,34 नुसार गुन्हा क्रमांक 593/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कासले करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैसे मागल्याच्या कारणावरून आत्महत्या