4 पोलीस निरीक्षक जाणार 5 येणार
9 सहायक पोलीस निरीक्षक जाणार 4 येणार
12 पोलीस उपनिरीक्षक जाणार आणि 12 येणार
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलीस परिक्षेत्रातील 12 पोलीस निरीक्षक, 16 सहायक पोलीस निरीक्षक आणि 38 पोलीस उपनिरीक्षक यांना नांदेड पोलीस परिक्षेत्रातील चार जिल्हाअंतर्गत बदली देण्यात आली आहे. हे आदेश आज दि. 19 ऑगस्ट रोजी पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी जारी केले आहेत. पोलीस महासंचालकांनी केलेल्या आदेशानंतर पारीत झालेल्या या बदल्या आदेशानुसार लातूर आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये पोलीस निरीक्षकांची संख्या मंजूर संख्येपेक्षा काहीशी जास्त झाली आहे.
आज दि. 19 ऑगस्ट रोजी 12 पोलीस निरीक्षकांना जिल्हाअंतर्गत केलेल्या बदल्या पुढीलप्रमाणे आहेत. त्यांच्या सध्याच्या नियुक्तीसह नवीन नियुक्तीचा जिल्हा कंसार लिहिला आहे. सुनील भीमराव निकाळजे-नांदेड (हिंगोली), सुनील रामराव नागरगोजे-लातूर (परभणी), नानासाहेब ज्ञानदेव उबाळे-लातूर, अनिल खेलबा चोरमले-लातूर (नांदेड), विश्वनाथ किशनराव झुंजारे-नांदेड, चंद्रशेखर आनंदराव कदम-नांदेड (हिंगोली), बालाजी महादू मोहिते-नांदेड (लातूर), रामेश्वर सौदागर तट-परभणी (लातूर), गजानन धोंडीबा सैलाने-परभणी, चंद्रशेखर तुकाराम चौधरी-परभणी, संजय भीमाशंकर हिबोरे-लातूर (नांदेड), दीपक ज्ञानोबा शिंदे-परभणी, अंगद ज्ञानोबा सुडके-हिंगोली (लातूर) अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यातून चार पोलीस निरीक्षक बाहेर गेले आहेत आणि पाच नांदेड जिल्ह्यात येत आहेत.
16 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यात नांदेड येथून 9 बाहेर गेले आहेत आणि नांदेड जिल्ह्यात 4 येणार आहेत. शरद सुभाष मरे-नांदेड, शिवप्रकाश प्रभाकर मुळे-नांदेड, अश्रोबा लिंबाजी घाटे-नांदेड, रविंद्र गोवर्धन सांगळे-नांदेड, सोमनाथ वसंत शिंदे-नांदेड, राजेंद्र केशवराव मुंडे-नांदेड, सुरेश एकनाथ मांटे-नांदेड (परभणी), अरूण बद्रीप्रसाद नागरे-नांदेड, हणमंत गंगाधरराव पांचाळ-परभणी (हिंगोली), रामकिशन तुकाराम नांदगावकर-नांदेड, अनिल सखाराम कुंरूदकर-नांदेड, बळीराम रामदास बंदखडके-हिंगोली (परभणी), संजय देवीचंद पवार-लातूर, शेख गफार शेख खलील-लातूर, नंदलाल बुरालाल चौधरी-परभणी, विशाल नागेशराव बहात्तरे-परभणी (नांदेड).
38 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, त्यात नांदेड येथून 12 जण बाहेर जात आहेत आणि 12 जण नांदेडला येत आहेत. महेश अंबादास गलगटे-नांदेड, श्रीप्रकाश भाऊराव शिंदे-नांदेड, शैलेश शिवाजीराव जाधव-परभणी, राजाभाऊ सिताराम जाधव-नांदेड, सुरेश कचरू नरवाडे-नांदेड (लातूर), गणेश नवनाथ कऱ्हाड-नांदेड, दिगंबर केशवबुवा जामोदकर-नांदेड, राजीव भाऊराव म्हात्रे-नांदेड, साईनाथ भुमन्ना अनमोड-हिंगोली, राम राघोजी जगाडे-नांदेड, भीमराव ज्ञानोबा कांबळे-नांदेड, शरद सुधाकर सावंत-नांदेड, सतिश विठ्ठलराव झाडे-नांदेड (परभणी), पंडीत रामराव थोरात-नांदेड, सतिश शिवाजीराव तावडे-परभणी, सदानंद तुकाराम मेडके-परभणी, विक्रम पांडूरंग विठूबोने-नांदेड, संतोष माधवराव मुपडे-परभणी (हिंगोली), रमेश साहेबराव गायकवाड-परभणी, हौसाजी लक्ष्मणराव मारकवाड-परभणी,मंगेश नरसिंगराव नाईक-परभणी, जसपालसिंघ राजासिंघ कोटतीर्थवाले-परभणी, प्रदीप गोपाळराव अल्लापूरकर-परभणी, विठ्ठल हनुमंतराव घोगरे-परभणी, विश्वनाथ विठ्ठलराव बोईनवाड-लातूर, संदीप बाबुराव थडवे-हिंगोली, विजय पुंडलीक पाटील-लातूर, नागोराव वसंतराव जाधव-लातूर, अमोल विठ्ठल गुंडे-लातूर, प्रदीप भानुदास बोंड-लातूर, गणेश बापूराव कदम-लातूर, गजानन विजय अन्सापूरे-लातूर, दिनेश दिगंबर शिंगनकर-लातूर, ज्ञानोबा त्र्यंबक मुलगीर-हिंगोली (हिंगोली).
सर्व बदली झालेल्या पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी दिले आहेत.
नांदेड पोलीस परिक्षेत्राअंतर्गत 12 पोलीस निरीक्षक, 16 सहायक पोलीस निरीक्षक आणि 38 पोलीस उपनिरीक्षकांना बदल्या